Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने ; सरकारचे शिष्टमंडळ शिवनेरीवर करणार चर्चा : मंत्री विखे पाटील

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या लवाजम्यासह मनोज जरांगे बुधवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मद्यपी कर्मचार्‍यांना एसटीत थारा नाही : मंत्री सरनाईक
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास
आनंदवन हे समाजसेवेचे विद्यापीठ : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या लवाजम्यासह मनोज जरांगे बुधवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मोर्चा पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते, मात्र मनोज जरांगे आपल्या भव्य मोर्चावर ठाम आहेत. तर दुसरीकडे हा मोर्चा मुंबईच्या बाहेरच थोपवण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ शिवनेरीवर मनोज जरांगे यांची भेट घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा आवाहन केले होते. त्यानंतर मराठवाडा विभागाच्या विविध भागातून शेकडो समाज बांधव रात्रीपासून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तर बुधवारी सकाळी जिल्ह्यातील डिग्रस कर्‍हाळे या गावातून सुद्धा शेकडो समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघत आहेत. साधारणतः छोट्या मोठ्या वाहनांमधून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. महिनाभर पुरे एवढे राशन सामान यासह आवश्यक तेवढ्या सर्व गरजेच्या वस्तू घेऊन मुंबईला निघालो आहे , अशी माहिती यावेळी समाज बांधवांनी दिली आहे.
मुंबई दौर्‍यावर जाताना मनोज जरांगे यांनी प्रवासा दरम्यान अंकुशनगर येथे आपल्या परिवाराची भेट घेतली, यावेळी त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी औक्षण केले, याप्रसंगी मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुला मुलीला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. यावेळी जरांगे यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वजण भावूक झाल्याचे दिसून आले. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवारपासून दोन दिवस बंद राहणार आहे. आडत असोसिएशन आणि हमाल माथाडी कामगार संघटनेने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजार समितीच्या आर्थिक उलाढाली वर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी किती दिवस सगळे सहन करतील, सत्ताधारी आणि विरोधातील मराठा आमदारांना आवाहन केले आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, आज समाजाला तुमची गरज आहे, समाज तुमच्या सोबत आहे, तुम्ही समाजासोबत राहा, कशालाही घाबरू नका सोबत या साथ द्या, असे आवाहन केले आहे.

शिंदे-पवार चांगले नेतृत्व ः मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे खरा माणूस आहे. त्यांना गरिबांची व्यथा समजते. अजित पवारही चांगले नेतृत्व आहेत त्यांच्याकडे गेले की ते गोर गरिगांची कामे करुण देतात. भाजपमधील अनेक मंत्री चांगले काम करतात असे मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

COMMENTS