Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भातील अनेक गावांना पावसाचा तडाखा

वर्धा ः विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसेच यवतमाळमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊ

दिपाली, रश्मी ठाकरेंवर बोलायची तुझी लायकी आहे का? 
रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे उद्या आयोजन
अहमदनगर पालिकेतील टेंडर घोटाळयाची सीबीआय चौकशी करा

वर्धा ः विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसेच यवतमाळमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील अनेक गावांना वादळ, गारपीट, अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आहे. संत्र्याची झाडे उन्मळून पडल्यामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्र्याची मोठ्याप्रमाणात गळतीही झाली आहे. जमिनीवर संत्र्यांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

COMMENTS