सोलापूर : जिल्ह्यातील मारकडवाडी पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधात केंद्र बनतांना दिसून येत आहे. रविवारी खासदार शरद पवार यांनी या गावाला भेट देत ईव्हीएम

सोलापूर : जिल्ह्यातील मारकडवाडी पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधात केंद्र बनतांना दिसून येत आहे. रविवारी खासदार शरद पवार यांनी या गावाला भेट देत ईव्हीएम हटाव, देश बचाव या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, इथे येण्यापूर्वी मी ऐकले की इथल्या लोकांनी तुम्हाला मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायची आहे, अशी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. कारण तुम्हाला निकालावर विश्वास नव्हता. हे आश्चर्यकारक आहे. निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, त्या दूर होणे गरजेचे असल्याचे मत खा. शरद पवार यांनी यावेळी मांडले.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोकसभा, राज्यसभेत आम्ही पाहतोय की अनेक खासदार आम्हांला भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात. सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव आहे कुठे. त्यामुळे गावाचे अभिनंदन आहे. ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात काही शंका निर्माण का झाली. तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा?; मारकडवाडीमध्ये शरद पवारांचा उपस्थित केला सवाल. मारकडवाडीच्या आंदोलनामुळे ईव्हीएम विरोधात देश पेटत आहे. तुम्हा सर्व ग्रामस्थाचे याबद्दल मी अभिनंदन करतो. निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. निकालच असे आलेत की लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थांना मतदानाच्या आकडेवारीवर शंका आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात बॅलेट पेपरवर मतदान होते, अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला आहे. तरीसुद्धा भारतात ईव्हीएमचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील काही निकालावर शंका व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. ह्या निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. या निवडणुकीत काही तक्रारी येतात, कुठे पराभव होतो हे होत आहे. पण संपूर्ण राज्यात याबद्दल शंका निर्माण झाली आहे. काही निकाल असे आले की जनतेच्या मनात शंका निर्माण झाली पाहिजे. शरद पवार म्हणाले की, जगातील मोठा देश अमेरिका आहे. अमेरिकेत मत मतपेटीत टाकले जाते. दुसरा मोठा देश इंग्लंड. तिथेही मत मतपेटीत टाकले जाते. यूरोप खंडातील सर्व देश आपल्या सारखे ईव्हीएमवर जात नाही. अमेरिका आणि काही देशांनी ईव्हीएमचा निर्णय घेतला. पण नंतर त्यांनी बदलला. जग असे आहे. तर भारतातच का? असा सवाल खासदार शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
राजीनामा देतो बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्या : जानकर
यावेळी बोलतांन आमदार उत्तम जानकर पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून पत्र घेणार असून येत्या दोन दिवसात मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. तर बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, असे विनंती जानकर आयोगाला करणार आहेत. आयोगाने परवानगी दिली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही जानकरांनी म्हटले आहे. आमच्यावर प्रशासनाने दबाव वाढवला तेव्हा आदल्या दिवशी रात्री गावामध्ये लोकं मंडपात झोपले होते. सकाळी मतदानाच्या दिवाशी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
निवडणूक मतपत्रिकेवर घ्या, ग्रामस्थांचा ठराव
मारकडवाडी गाव सध्या देशामध्ये झळकतांना दिसून येत आहे. या गावाने रविवारी ईव्हीएमवर निवडणूक नको, ती मतपत्रिकेवर व्हावी असा ठराव मांडला आणि तो ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. तो ठराव आम्ही आम्ही निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असा विश्वास खा. शरद पवार यांनी मारकडवाडीतील जनतेला रविवारी दिला.
COMMENTS