लस घेण्यास अनेकांकडून टाळाटाळ : आरोग्यमंत्री टोपे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लस घेण्यास अनेकांकडून टाळाटाळ : आरोग्यमंत्री टोपे

जालना/प्रतिनिधी : राज्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असला तरी, देखील लस घेण्यासाठी अनेकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.सरकारकडून 100 टक्के लसीकरणासाठी

Aurangabad : संभाजीनगर लिहिण्याचा अधिकार कोणी दिला- खा.इम्तियाज जलील (Video)
भाजप- शिवसेना एकत्र येणार..? मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा… म्हणाले.. तर आपण सहकारी होऊ… (Video)
विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ loknews24

जालना/प्रतिनिधी : राज्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असला तरी, देखील लस घेण्यासाठी अनेकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.सरकारकडून 100 टक्के लसीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण ऐच्छिक केल्याने अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलतांना टोपे म्हणाले की, कालच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन संदर्भात काहीही म्हणाले नाही. मात्र लॉकडाऊन लावताना समान नियम निकष हवे अशी मागणी पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकांनी नियम पाळावे. पहिल्या डोसपासून 98 लाख लोक वंचित आहेत. लसीकरण ऐच्छिक केल्याने अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कायदेशीर दृष्टीने लसीकरण ऐच्छिक करता येईल का? याबाबत केंद्राकडे लेखी मागणी केल्याचे देखील ते म्हणाले. कोरोनाचा नवीन व्हेरीयंट हा म्युटेशनमधून तयार होतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या बैठकीत नवीन व्हेरीयंटला सामोरे जा असे आवाहन केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच, त्यानुसार राज्याचा आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. असेही देखील टोपे यांनी यावेळी सांगितले. आरोग्य सुविधा मजबूत करणे, लसीकरण वाढण्याबाबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्याचे टोपे यांनी सांगितले. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्बंध जेवढे टाळता येईल तेवढे लावणे टाळा असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले. असेही ते म्हणाले.

COMMENTS