Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्हा बँक अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी जयश्रीताई पाटील

शिराळा / प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदी शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्री पाटील

शिराळा न्यायालयाकडून पुन्हा राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट; शिरीष पारकरांना जामीन
म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु
सुपने विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा एकहाती विजय

शिराळा / प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदी शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळाला आहे. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.
जिल्हा बँकेसाठी 21 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाआघाडीच्या सहकार पॅनेलने 17 तर भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलने 4 जागांवर विजय मिळवला. महाआघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाबाबत उत्सुकता होती. अध्यक्ष पदावर आमदार मानसिंगराव नाईक यांचा प्रबळ दावा होता. त्यामुळे त्यांची निवड ही निश्‍चित होती. उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांचेच नाव चर्चेत होते. आज दुपारी सव्वा तीन वाजता बँकेच्या राजारामबापू पाटील सभागृहात सर्व संचालकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरु झाला. निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे, सहाय्यक अधिकारी उर्मिला राजमाने, सुनिल चव्हाण यांची उपस्थिती होती. निवडणुकीचा अहवाल सहकार निवडणूक प्राधिकरण व विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे पाठवला आहे त्यांच्याकडून पदाधिकारी निवडीची अधिसूचना जारी झाली. अध्यक्ष पदासाठी आमदार नाईक व उपाध्यक्ष पदासाठी श्रीमती जयश्री पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे बिनविरोध निवड झाली. आ. नाईक यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून मावळते अध्यक्ष दिलीप तात्या पाटील होते. आ. अनिल बाबर यांनी अनुमोदन दिले. श्रीमती पाटील यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून मावळते उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते. पृथ्वीराज पाटील यांनी अनुमोदन दिले. निवडी नंतर संचालक मंडळाच्या वतीने नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करताना काँग्रेसने अध्यक्ष पदावर दावा सांगितला होता. मात्र, सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहिले. काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील यांची वर्णी लागली. निवडीनंतर जिल्हा बँक परिसरात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

COMMENTS