कल्याण प्रतिनिधी - मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 25 घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत चोरट्यांना पकडण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हे
कल्याण प्रतिनिधी – मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 25 घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत चोरट्यांना पकडण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हे दोन्ही चोरटे मुंब्रा परिसरात राहणारे असून विशेषतः मेडिकलला टार्गेट करत कटावणीच्या मदतीने शटर तोडून रोखरक्कम सह नशा करण्यासाठी कोरेक्स सिरफची चोरी कारायचे. अश्याच प्रकारे रात्री मानपाडा परिसरात चोरी करून मोटार सायकल वरून पळ काढत असताना , पोलिसांची गाडी दिसल्याने मोटारसायकल सोडून अंधाराचा फायदा घेत पळण्याच्या तयारीत असलेल्या या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेत विचारपूस केली असता या आरोपीने घरफोडी केल्याची कबुली देत 21 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. सारुद्दिन ताजुद्दीन शेख आणि मोहम्मद जिलानी ईसा शहा अशी या दोन आरोपींची नावे असून पोलिसांच्या माहिती नुसार या आरोपीनवर डोंबिवली पोलीस ठाणे , विष्णू नगर पोलीस ठाणे तसेच ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल झाले आहेत. तर मुंबई येथील पायदुनी, सायन, ताडदेव, व्ही.पी .रोड , नागपाडा, आगरीपाडा या पोलीस ठाण्यात सुमारे 25 घरपोडी गुन्हे अश्या प्रकारे एकूण 36 चोरीचे गुन्हे दाखल आहे. सध्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत कल्याण झोन 3 चे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे , पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, पोलीस सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे , मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे याची टीम अधिक तपास करत आहे.
COMMENTS