Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज संसारे यांचे निधन

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्

चंद्रपूर, सिंधुदुर्गमध्ये सोन्याच्या खाणी
संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंग समिती स्थापन
म्हसवडमध्ये भरदिवसा डॉक्टरांच्या घरात बंदुकीच्या धाकाने दरोडा

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. एक झुंझार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे ओळखले जायचे. संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष’ स्थापन केला होता. गेले काही दिवस ते आजारी होते. मनोज संसारे यांनी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. सध्या ते ‘युथ रिपब्लिकन पार्टी’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

COMMENTS