Homeताज्या बातम्या

मनोज जरांगेंची नेवाशात लवकरच घोंगडी बैठक

नेवासा फाटा : नेवासा तालुक्यात लवकरच मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, नेवासा तालुक्यात

भू- करमापक सचिन काठे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख लंपास
आसाममध्ये 22 जानेवारीला ड्राय डे

नेवासा फाटा : नेवासा तालुक्यात लवकरच मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, नेवासा तालुक्यातील मराठा समन्वयकानी दिलेले निमंत्रण जरांगे पाटील यांनी स्वीकारल्याचे सुरेश पाटील शेटे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी अविरत लढा देणारे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी सध्या महाराष्ट्रभर दौरे करत ठिकठिकाणी घोंगडी बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. याची धडकी राज्य सरकार तसेच इतर पक्षांनाही भरली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघात मराठा बांधावाकडून जरांगे पाटील यांच्या या घोंगडी बैठकांचे आयोजन केले जात आहे. या घोंगडी बैठकांमधे पाटील यांनी आरक्षणसाठी लढा देणारे मराठा सेवक निर्माण करण्याचे आवाहन समाजास केलें आहे. नेवासा तालुक्यातून देखील मराठा समाजाच्या समन्वयकानी आंतरवली सराटी या ठिकाणी जरांगे पाटील यांची भेट घेऊन नेवासा तालुक्यात घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती केली. यावेळी पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नेवासा तालुक्यात घोंगडी बैठकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दीले तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात लवकरच मराठा सेवक निर्माण करा असेही आदेश दीले. या भेटीवेळी दिलेल्या आश्‍वासनामुळे लवकरच जरांगे पाटलांच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात येणार हे स्पष्ट झाले आहे. या भेटीवेळी सुरेश शेटे पाटील,संभाजी माळवदे, संतोष काळे, रावसाहेब घुमरे, आदीसह तालुक्यातील मराठा समन्वयक उपस्थित होते. यावेळी सुरेश शेटे यांनी लवकर तालुका दौरा करून प्रत्येक गावात मराठा सेवक निर्माण करण्याचे कार्य करण्यात येईल. तर संतोष काळे यांनी येत्या येत्या आठवडाभरात बैठकीचे स्थान निश्‍चित करण्यात येईल व तालुक्यात बैठकीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात येईल. संभाजी माळवदे यांनी तालुक्यातील जनतेला मराठा सेवक म्हणून सामील होण्याचे आवाहन करत आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहन केले. तर रावसाहेब घुमरे यांनी घोंगडी बैठकीच्या निमित्ताने तालुक्यातील मराठा बांधवानी एकत्रित येण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट केले.यावेळी तालुक्यातील उपस्थित मराठा समन्वयकानी पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

COMMENTS