Mangalvedha : ट्रॅक्टर – मोटारसायकलचा भीषण अपघात… एकाच जागीच मृत्यू … (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Mangalvedha : ट्रॅक्टर – मोटारसायकलचा भीषण अपघात… एकाच जागीच मृत्यू … (Video)

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा- मरवडे मार्गावर ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून मोटर सायकलस्वारास धडक दिल्याने एका जणाचा जागीच मृत्य

रात्रीच नंबर लावायला निघाले, काळाने डाव साधला, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू
सिन्नर -शिर्डी राज्य मार्गावर खाजगी आराम बस आणि ट्रकचा भीषण अपघात
शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघात

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा- मरवडे मार्गावर ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून मोटर सायकलस्वारास धडक दिल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकबर शेख वय 38, रा. बालूग्राम जिल्हा साहेबगंज, झारखंड याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जितेंद्र दुर्योधन साखरे राहणार उचेठाण याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास  मरवडे ते मंगळवेढा रस्त्यावरील तळसंगी फाट्याजवळील माऊली हॉटेलजवळ झाला. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने अकबर शेख हा गंभीर जखमी होवून जागेवर मयत झाला. तर पाठीमागे बसलेला रबीउल शेख हा जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलिस हवालदार महेश कोळी यांनी घटनास्थळी जावून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. 

COMMENTS