Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

आमदार आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागातील संवत्सर कोकमठाण परिसरात शुक्रवार (दि.10) रोजी दुपारनंतर पाच वाजेच्या सुमारास जोरदार वार्‍यासह झालेल

‘समृद्धी’च्या 26 किलोमीटरच्या सर्व्हिस रोडसाठी 52 कोटी मंजूर
निळवंडे लाभ क्षेत्रातील पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या
जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागातील संवत्सर कोकमठाण परिसरात शुक्रवार (दि.10) रोजी दुपारनंतर पाच वाजेच्या सुमारास जोरदार वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहे.
अवकाळी पावसाने अक्षय तृतीयेच्या सायंकाळी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे संवत्सर, कोकमठाण या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले असून मोठ मोठे वृक्ष विजेच्या तारांवर पडल्यामुळे वीज प्रवाह देखील खंडित झाला होता.मागील एक महिन्यापासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना झालेल्या पावसामुळे तात्पुरता थंडावा मिळाला असला तरी काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी सविस्तर माहिती घेवून झालेल्या नुकसानीचा आढावा घेत तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नुकसानग्रस्त नागरीकांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यास संगितले आहे. संवत्सरला वीजप्रवाह खंडीत झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असता नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून नागरिकांसाठी पाण्याचा टँकर देण्यात आला आहे.

COMMENTS