Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.नमिताताई मुंदडांच्या पाठपुराव्याला यश

केज मतदारसंघातील तीन उपकेंद्रांना 10 एमव्हीए चे नवीन ट्रान्सफॉर्मरधनेगाव, युसूफ वडगाव आणि हनुमंत पिंप्री परिसरातील शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध ह

सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात ‘महा पाणलोट प्रकल्पा’ला सुरुवात
राजुरी परिसरातील 8 ते 10 गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यातून मार्गी

केज मतदारसंघातील तीन उपकेंद्रांना 10 एमव्हीए चे नवीन ट्रान्सफॉर्मर
धनेगाव, युसूफ वडगाव आणि हनुमंत पिंप्री परिसरातील शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध होणार
केज । प्रतिनिधी
केज मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या सिंचन आणि वीज पुरवठ्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार नमिताताई मुंदडा यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून, त्याला यश मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वरिष्ठ कार्यालयाकडून धनेगाव, युसूफ वडगाव आणि हनुमंत पिंप्री येथील 33 केव्ही उपकेंद्रांसाठी प्रत्येकी 10 एमव्हीए क्षमतेचे उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आज दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या भागातील शेतकरी अपुर्‍या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त होते. विशेषतः रब्बी हंगामात सिंचनासाठी रात्री शेतात जावे लागल्याने शेतकर्‍यांची मोठी ओढाताण होत होती. आता 10 चत- क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळे: मतदारसंघातील तीन महत्त्वाच्या केंद्रांवर एकाच वेळी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. आमदार नमिताताई मुंदडा यांनी महावितरणच्या वरिष्ठ स्तरावर तांत्रिक अडचणी मांडून हे वाढीव क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतले होते. आज हे ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्षात दाखल झाल्याने केज मतदारसंघातील कृषी पंपांच्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. शेतकर्‍यांच्या कष्टाची आम्हाला जाणीव आहे. वीज पुरवठा सुरळीत व्हावा आणि माझ्या शेतकरी बांधवांना रात्रीचा त्रास होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न होता. या तीन नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल. या निर्णयामुळे केज मतदारसंघातील शेतकर्‍यांसाठी दिवसा वीज उपलब्ध होण्याची व्यवस्था झाली असून, भविष्यातील सिंचन हंगामात शेतकर्‍यांचे मोठे हातभार लागणार आहेत.

COMMENTS