Majalgaon : आझाद नगर येथील मूलभूत प्रश्नवार सलीम बापू आक्रमक (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Majalgaon : आझाद नगर येथील मूलभूत प्रश्नवार सलीम बापू आक्रमक (Video)

माजलगाव शहरातील आझाद नगर भागातील नागरिकांना नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेच्या नाकर्तेपणाच्या विरोधात र

Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Video)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन

माजलगाव शहरातील आझाद नगर भागातील नागरिकांना नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेच्या नाकर्तेपणाच्या विरोधात रास्ता रोको व भव्य निदर्शणे  लोक तांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सलीम बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . येथील नगरपालिकेला आझाद नगर भागातील नागरिकांच्या ज्वलंत  मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले आहे. यात खालील मागण्यांचा समावेश आहे . आझादनगर येथील लोकांचे भोगवटदार व किरायदार यांचा  तात्काळ सर्वे करुन भोगवटदार व किरायदार यांना गुंठेवारी करुन मालकीची पी. टी. आर. देण्यात यावी, सर्व किरायदार व भोगवटदारांना घरकुलाचे लाभ देण्यात यावे., धारुर रोड ते बायपास रोड या डि.पी. रोडला जलवाहिणी टाकून सिमेंट रस्ता तात्काळ करण्यात यावा ,  आझादनगर येथील प्रलंबीत रस्ते व नाल्या तात्काळ दुरुस्थ  करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे .

COMMENTS