।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून न
।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निळवंडे डावा व उजवा कालव्याला दि.२० एप्रिल पासून उन्हाळी आवर्तन सुटणार आहे. आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा खंडित न होता सुरळीत ठेवा, असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याना व कर्मचाऱ्यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांनी टंचाई आढावा बैठकीत महावितरणच्या विरोधात आमदार अमोल खताळ यांच्याकडे अनेक तक्रारी उपस्थित केल्या होत्या. त्या तक्रारीवर मार्ग काढण्यासाठी महावितरण कार्यालयात आ. अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
याबैठकीस अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपअभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील आणि सुनील अहिरे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील वीज उपकेंद्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
ग्रामीण भागातील अनेक विजेचे रोहित्रांरावर अतिरिक्त भार येत असल्यामुळे विजेचे रोहित्र खराब होत आहे. त्यामुळे अतिरिक्त भार असणाऱ्या विजेच्या रोहित्रावरील भार कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करा, असे निर्देश आमदार खताळ यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले.
महावितरणच्या कार्यालयात आलेल्या ग्राहकाला अधिकारी व कर्मचारी उद्धटपणाची वागणूक देत आहे, अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या कार्यालयातक्रार घेऊन आलेल्या प्रत्येक नागरिकांशी सौजन्याने बोला आणि त्यांची काय अडचण आहे ती समजून घ्या, अशी सूचना आ. खताळ यांनी दिले.
महावितरणच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार-आ खताळ
महावितरणचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांचे कार्यालय दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची ससेहोलपट होत आहे. ती ससेहोलपट थांबविण्यासाठी कार्यकारी अभियंता उपअभियंता यांचे कार्यालय एकाच छताखाली यावीत यासाठी महावितरणच्या मोकळ्या जागेत कार्यालयाची इमारत करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवण्यासाठी मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करेल, असा विश्वास आ.खताळ यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना दिला.
COMMENTS