Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक

मदत करणार्‍या आई-बहिणीसह 12 जण ताब्यात

मुंबई : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी तीन दिवसांपासून फरार असलेल्या मिहीर शहाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मिहीरसह एकूण 12 जणांच

क्षुल्लक कारणावरुन एसटी ड्रायव्हर आणि कंटक्टरला जबर मारहाण.
येरवडा परिसरामध्ये एसटी महामंडळाची शिवशाही बस जळून खाक 
मी भाजपाच्या प्रत्येक मतदारसंघात जाईन आणि तिथून त्यांना हाकलून लावेन…

मुंबई : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी तीन दिवसांपासून फरार असलेल्या मिहीर शहाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मिहीरसह एकूण 12 जणांच्या मुसक्या आळण्यात आल्या आहेत. यात त्याला घटनेनंतर पळून जाण्यात मदत करणार्‍या आई व बहिणीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.मिहीर शहा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेत्याचा मुलगा आहे. मिहिर शहाने रविवारी पहाटे बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. कावेरी नाखवा (वय, 45) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास नाखवा या त्यांचे पती प्रदीप यांच्यासोबत अ‍ॅनी बेझंट रोडवरून जात होत्या. त्यावेळी मिहिर शाह चालवत असलेल्या बीएमडब्लू कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नाखवा यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात प्रदीप यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. याप्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे. मिहीर शहा हा एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. घटनेच्या वेळी मिहीर शाह आणि राजेंद्र सिंह बिडावत हे बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, घटनेच्या वेळी मिहीर शाह गाडी चालवत होता. या घटनेनंतर मिहीर शहा फरार झाला होता. त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि कुटुंबचालक राजेंद्रसिंह बिदावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाह आणि बिदावत मरीन ड्राइव्ह येथे ड्राईव्ह करून घरी परतत होते. घटनेच्या वेळी मिहीर शाहने मद्यपान केले होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रदीप नाखवा यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 105, 281, 125 (ब), 238, 324 (4), 184, 134 (अ), 134 (ब) आणि 187 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. याआधी पुण्यात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली.

मृत महिला अभिनेते जयवंत वाडकरांची पुतणी – उल्लेखनीय बाब म्हणजे मृत कावेरी नाखवा या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी आहेत. वाडकर यांनी या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीने गाडी चालवणे ही केवळ विकृती आहे.

COMMENTS