Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मै भी राहुल म्हणत युवक काँग्रेसचे माहूरात जेलभरो आंदोलन !

माहूर प्रतिनिधी - काँग्रेस नेते  राहुल गांधी यांचे विरुद्ध कट रचून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याचा आरोप करत आक्रमक होऊन युवक काँग्रेसने’ मै

रेणापूर येथे रुग्णालयात फळांचे वाटप
रेणा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

माहूर प्रतिनिधी – काँग्रेस नेते  राहुल गांधी यांचे विरुद्ध कट रचून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याचा आरोप करत आक्रमक होऊन युवक काँग्रेसने’ मै भी राहुल ,लिहिलेल्या  गांधी टोपी परिधान करून  किनवट-माहूर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे माहूर शहरात दि. 31 रोजी जेल भरो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेकडो युवक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. राहुल गांधी यांनी लोकशाहीमध्ये महत्वाची भूमिका बजावत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेच्या मनातील प्रश्न विचारले असता  उत्तरे देणे अडचणीचे वाटू लागल्याने  त्यांच्या विरुद्ध कट रचून यंत्रणावर दबाव टाकून तातडीने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची जी कार्यवाही केली. ती लोकशाहीची मुस्कटदाबी करणारी असून लोकशाहीचा अस्त करून हुकुमशाहीचा उदय करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे देशभरतील लोकशाही वादी जनता ही राहुल गांधी यांच्या पाठीशी असून राहुल गांधी संसदेत जे प्रश्न विचारत होते ते जनतेचे प्रश्न आहेत आणि आमच्याही मनात तेच प्रश्न असल्याने अनेक जन  मै भी राहुल असा मजकूर लिहिलेल्या टोप्या घालून आम्हालाही जेलमध्ये टाका असा आग्रह धरीत किनवट माहूर विधानसभा युवक काँग्रेसने,  युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. निरंजन केशवे यांच्या नेतृत्वात जेल भरो आंदोलन केले. यावेळी  प्राचार्य राजेंद्र केशवे, दिलीप मुनगिलवार,  किसान सेल चे किनवट तालुकाध्यक्ष संतोष अडकीने, विलास भंडारे, युवक काँग्रेस किनवट-माहूर विधानसभा अध्यक्ष अमोल केशवे, अमोल पाटील, सचिन बेहेरे,  राजु सौंदलकर,  अतुल पाटील,आकाश कांबळे, सिद्धार्थ  तामगाडगे, विक्रम राठोड,आनंदराव कलाने, निसार कुरेशी, अजीम सय्यद,  देवानंद जाधव, प्रवीण काळे, आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. माहूर पोलीस ठाण्याचे  स.पो.नि संजय पवार, पो.हे.कॉ. गंगाधर खामनकर, पो.कॉ. सुशील राठोड, पोलीस नायक शिरीष डगवाल  आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान, माहूर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले.

COMMENTS