Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी ग्राहकांना महावितरणच्या  ॲपवर सुविधा

नाशिक - ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून खबर द

मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचीही आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN
बीडमधील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण होणार डॉ.योगेश क्षीरसागर
मुंबई पोलिस भरतीत हायटेक कॉपी

नाशिक – ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून खबर द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. यामुळे खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात बिघडलेला ट्रान्सफॉर्मर बदलला जात आहे. तथापि, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी महावितरणच्या मोबाईल ॲपवरील सुविधा वापरणे ग्राहकांसाठी सोपे ठरू शकते.

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, हेच उशीराने समजले तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे.

ॲपवरून तक्रार अशी करा –

• मोबाईलवर महावितरण हे ॲप उघडा

• नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा या बटणावर क्लिक करा

• ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करा

• आपले कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मरला जोडलेले आहे, त्याचा नंबर, गाव, तालुका व जिल्हा याची माहिती भरलेली दिसेल.

• ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा

• संबंधीत ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा

• नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा

• ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल. 

• ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल.

COMMENTS