महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या  शेतावर भेटी व मार्गदर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर येथील तालुका कृषि अधिकारी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यां

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या रोड रोमिओस अटक
आईला मारहाण करून घराबाहेर हाकलले

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर येथील तालुका कृषि अधिकारी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या  शेतावर भेटी आयोजित केल्या होत्या.            त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचरणे, टोमॅटो प्रकल्पाचे प्रमुख डॉ. अनिकेत चंदनशिवे, भाजीपाला पिके तज्ञ डॉ. अन्सार अत्तार, किटकशास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पवार व हॉर्ट्सप प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. नंदलाल देशमुख यांनी अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक व संगमनेर तालुक्यातील निमज या गावातील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांच्या शेताला भेटी दिल्या.

भेटी दरम्यान असे निदर्शनास आले की, रब्बी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटोची तोडणी सुरू झालेली आहे तसेच काही प्रक्षेत्रांची तोडणी सुरू होणार आहे. त्याच बरोबर काही शेतकरी उन्हाळी हंगामासाठी टोमॅटो लागवडीची तयारी करत आहेत. प्रक्षेत्र भेटी दरम्यान असेही निदर्शनास आले की काही शेतकर्यांच्या टोमॅटो पिकावर रसशोषण करणार्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी व टूटा नागअळी या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्या अनुषंगाने कीड व रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या भेटी दरम्यान अकोले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री. हासे साहेब, संगमनेर तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री. गोसावी साहेब व त्यांच्या विभागाचे कृषि अधिकारी उपस्थित होते. भेटी दरम्यान कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी व टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली व चर्चे दरम्यान शेतकर्याच्या शंकांचे निरसन करून टोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, तसेच हॉर्टसॅप प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तानाजी नरुटे व समन्वयक डॉ. संजय कोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS