Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनायक प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी

बीड प्रतिनिधी - 11एप्रिल रोजी बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी रेमो डिसूझासोबत खेळणार गरबा.
पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूची नियुक्ती रद्द करा
मध्य प्रदेशात उसळला हिंसाचार

बीड प्रतिनिधी – 11एप्रिल रोजी बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे श्री.अशोक काशीद सर, भारती क्षीरसागर मॅडम.शैलजा बावसकर मॅडम, महानंदा मुंडे मॅडम, उत्तरेश्वर भारती सर, सुनिता चौधरी मॅडम,यांच्या शुभहस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यांचा आढावा श्री.गणेश भागडे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केला. अनिष्ठ रूढी परंपरेला न जुमानता क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी,स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले अजरामर होऊन गेले असे मौलिक विचार प्रमुख पाहुणे शाळेचे शिक्षक श्री.अशोक काशीद सर यांनी व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ. संजीवनी पवळ मॅडम, मनीषा चौधरी मॅडम, श्री. गव्हाणे विवेक सर, शैलजा बावस्कर मॅडम,शारदा बहिरमल मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम, महानंदा मुंडे मॅडम यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंच्या जीवनातील कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.स्त्री यांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, अनिष्ठ चालीरीती, समाजप्रबोधन, सामाजिक असमतोल नसावा, सर्व धर्म समभाव अशा विचारांची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले एक असामान्य विचारवंत, समाजसुधारक होऊन गेले. चूल आणि मूल या चौकटीत स्त्रियांना न ठेवता तिला स्वतंत्र करण्यासाठी खुप त्रास सहन केला अशा ज्योतिबा फुलेंमुळे आज महिला शिक्षित होऊन महत्वाच्या स्थानांवर कार्य करत आहेत, ज्योतिबां एक क्रांतिसूर्य होऊन गेले, आपल्या कर्तृत्वाचा विचार समाजाला दिशा देऊन गेले असे आपल्या अध्यक्षीय समारोपीय सविस्तर मार्गदर्शनातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती निमित्ताने अभिवादन व्यक्त केले. या  कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सिमा उदगीरकर मॅडमनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले

COMMENTS