Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीर काळे यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रम

कोपरगाव प्रतिनिधी ः मराठी प्रेक्षकांच्या अव्वल पसंतीचा ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पोट धरून हसव

सविता पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार  
राहुरी विद्यापीठाच्या हरभरा वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड
 कर्जत-जामखेडचा सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी – आमदार रोहित पवार

कोपरगाव प्रतिनिधी ः मराठी प्रेक्षकांच्या अव्वल पसंतीचा ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पोट धरून हसवत आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांचा ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ हा आगळा वेगळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे कलाकार रसिकांना पोट धरून हसवण्यासाठी कोपरगावच्या दौर्‍यावर येत असून या कार्यक्रमाचा कोपरगाव तालुक्यातील तमाम रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 03 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर कोपरगाव तालुक्यातील रसिकांना मनमुराद हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे कलाकार येत आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौगुले, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे-संबेराव, वनिता खरात, रोहित माने यांच्या समवेत सुप्रसिद्ध गायक अंजली गायकवाड, चैतन्य देवरे, रील स्टार नृत्यांगना माधुरी पवार आदी दिग्गज कलाकारांना जवळून पाहण्याची, त्यांचे कलाविष्कार अनुभवण्याची संधी कर्मवीर शंकररावजी काळे मित्र मंडळाने कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्देश्‍वर झाडबूके, चैताली जाधव करणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर जावून पोहोचला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी रसिकांना धकाधकीच्या जीवनात आपल्या विनोदाने मनसोक्त हसवीले आहे. या कार्यक्रमातील हलक्या फुलक्या विनोदांनी प्रेक्षकांना हसवता हसवता रसिकांच्या मनावर लोकपसंतीची मोहोर उमटविली असून आता कोपरगावच्या रसिकांना हसविण्यासाठी हे कलाकार कोपरगावात येणार आहेत. यापूर्वीही दिग्गज विनोदी कलाकारांना भेटण्याची व त्यांच्या कलाकृतीतून पोट धरून हसविण्याची संधी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने उपलब्ध करून दिली असून पुन्हा एकदा विनोद क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना भेटण्याची व पोट धरून हसण्याची संधी न दवडता या महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ या कार्यक्रमास कोपरगाव तालुक्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकररावजी काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

COMMENTS