Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांचे आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन

वर्धा प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांचे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. वेतन त्रुटी समिती यांच्या

पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु
संजय अमोलिक यांचा अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने गौरव
कल्याण डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

वर्धा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांचे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. वेतन त्रुटी समिती यांच्या समक्ष तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने यापूर्वी 1998 पासून वारंवार तहसीलदार राजपत्रित वर्ग दोन यांना इतर समक्ष वर्ग दोन पदाची वेतनश्रेणी लागू करावी यासाठी निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन भूमिका मांडणे सादरीकरण करूनही जाणीवपूर्वक संघटनेच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या मागणीसाठी  तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद आंदोलनामुळे सर्व शेतकरी व नागरिकांना आंदोलनामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल अजय झिले नायब तहसिलदार, महाराष्ट्र तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना जिल्हा अध्यक्ष यांनी याबाबत दिलगिरी सुध्दा व्यक्त केली आहे.

COMMENTS