Homeताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेवर; तीन संकेत!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या वेळेत होतील की नाही अशी सांशकता असताना, वेळेवर निवडणुका होण्याचे तीन संकेत काल मिळाले. यामध्ये पहिला संकेत महाराष

वाकडीत एक हजार विद्यार्थांना बुट आणि सॉक्सचे वाटप
अहमदनगरच्या उड्डापुलाचे उद्घाटन करण्याची घाई कशासाठी ?
अंदरसूल सोसायटी निवडणुकीत शिवशक्ती प्रगती पॅनलचा दणदणीत विजय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या वेळेत होतील की नाही अशी सांशकता असताना, वेळेवर निवडणुका होण्याचे तीन संकेत काल मिळाले. यामध्ये पहिला संकेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या मतदारसंघ निहाय आढावा घेण्याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्याची घोषणा. त्याचबरोबर एमआयएम या पक्षाचे नेते असवुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या पक्षाच्या पाच उमेदवारांची घोषणा ही केली. अर्थात, यामध्ये त्यांचे विद्यमान आमदार आणि ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून येणेची त्यांना अधिक शक्यता वाटते, असे काही मतदार संघ. अशी एकूण पाच तिकीट त्यांनी वितरित केली. तर, तिसरी घटना वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी उभारणीचे दिलेले संकेत. अर्थात, हे संकेत त्यांनी यापूर्वीही दिले होते. परंतु, आता ही आघाडी उभारण्यासाठी त्यांनी जलद गतीचे प्रयत्न सुरू केले आहे. या तीनही घटना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या २६ नोव्हेंबरच्या आधी नवी विधानसभा महाराष्ट्राला लवकरच मिळेल, या दिशेने एक आशादायी आणि ठोस पावले आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये इतर कुठलाही घटनाक्रम घडत असला तरी, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मधलं राजकीय द्वंद्व आणि संघर्ष हा प्रमुख राहील. भारतीय जनता पक्षाच्या जागा या निवडणुकीत कमी होतील; त्या निम्याहून अधिक कमी होतील, असा अंदाज सर्वच राजकीय निरीक्षक, राजकीय नेते नोंदवताना दिसतात. तर, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरत नसल्याने, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही; अशी टीका भाजप आणि महायुती कडून करण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडीतील या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने एक वेगळा तर्क मांडत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा घोषित केला पाहिजे, अशी अप्रत्यक्ष सूचना त्यांच्या वक्तव्यातून येते. त्यांच्या मते ज्या पक्षाला अधिक जागा मिळतील त्यांचा मुख्यमंत्री करणे, हा सर्वात घातक असा फॉर्मुला आहे. या फॉर्मुल्यामुळे भाजप शिवसेना या आघाडीमध्ये शिवसेनेच्या जागा कमी कशा येतील, याचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सुरू असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे, ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री हा फार्मूला ठरवलं. हे अतिशय धोकादायक आहे. एका अर्थाने उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीला एक इशारा दिला आहे की, मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही चेहरा घोषित करा. त्यासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा घोषित करण्याची त्यांना अपेक्षा आहे. पण, या व्यतिरिक्त जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जागा कमी होतील अशी भीती वाटत असल्याने, ते उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करत नाही. अर्थात, महाविकास आघाडीची सत्ता बहुमताने आली तर निश्चितपणे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील. परंतु, निवडणुकीपूर्वी जर त्यांचं नाव जाहीर केलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पेक्षाही उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राजकीय नेत्यांचा आणि तरुणांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू होईल, ही भीती लक्षात घेता अशा प्रकारच्या नावाची घोषणा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना राजकीय पराभवाची भीती वाटते का, अशी शंकाही येते. मुख्यमंत्रीपदासाठी एकदा चेहरा घोषित झाला तर त्या पक्षाच्या जागा निश्चितपणे वाढण्यास मदत होईल. त्यामुळे हा फार्मूला देखील योग्य आहे की, ज्यांच्या जागा अधिक येतील त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यानंतर घोषित करावा. संवैधानिक लोकशाहीमध्ये विधिमंडळाचा मुख्यमंत्री कोण हे ठरवण्याचा अधिकार आहे. तो तसाच असावा. तो निवडणुकीच्या आधी ठरवणं म्हणजे एक प्रकारे संविधानाच्या विसंगत भूमिका घेणे, असाच त्याचा अर्थ होईल.  महाविकास आघाडी महायुती हे आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात आता सुरू झाली आहे. निवडणूक आयोग निवडणुकीचा आढावा घेण्याच्या कामास लागले आहेत. अशा सगळ्याच बाबी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका योग्य वेळी होतील याची ही नांदी आहे.

COMMENTS