Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महादेव जानकरांचा परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल

परभणी ः महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी (दि.1) दुपारी आपला उमेदवारी

मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…
परभणीत महादेव जानकर यांना मोठा धक्का
लोकसभेसाठी पाच जागा द्या, अन्यथा सर्व पर्याय खुले

परभणी ः महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी (दि.1) दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जानकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांच्यासमवेत भाजपचे नेते माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खा.सुरेश जाधव, माजी आमदार रामराव वडकुते, भाजपचे जेष्ठ नेते विजय वरपूडकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, आनंद भरोसे, राजेश देशमुख, बापू घडामोडे, दिलीप थोरात, प्रमोद वाकोडकर, भाजपचे लोकसभा सह समन्वयक डॉ.केदार खटींग, बाळासाहेब जाधव, स्वराजसिंह परिवार आदी महायुतीचे नेते उपस्थित होते. महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केला. यावेळी आ.लोणीकर, आ.बोर्डीकर, माजी खा.जाधव आणि विटेकर हे चार नेते महायुतीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते.

COMMENTS