Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी

छ.संभाजीनगर : राज्यात बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्

गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
 रेल्वे ची वायर तुटल्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस बंद
एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप.

छ.संभाजीनगर : राज्यात बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा हा 39 डिग्री अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. या वाढत्या उन्हामुळे राज्यातील पहिला बळी संभाजी नगर येथे गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये उष्माघतामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे घरा बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राधेश्याम कुलकर्णी (वय 30) असे उष्माघातामुळे बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. वाढलेल्या उन्हामुळे त्याला स्ट्रोक आल्याने गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. राधेश्याम हा पैठण येथील बिडकीन येथे एका कंपनीत काम करत असून तो जैनपूर मार्गाने बिडकीनकडे घरी येत असतांना त्याला अचानक चक्कर आली. यावेळी त्यांचा तोंडातून फेस आल्याने त्याला तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याकहा मृत्यू झाल्याचे घोषित केले. वाढत्या उन्हामुळे त्याला चक्कर येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. राज्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे ढग असले तरी उद्यापासून राज्यात हवमान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने धाराशिव, लातूर, सोलापूर, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ अकोला जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

COMMENTS