Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दसर्‍याला चौंडीत धनगर आरक्षणासाठी महामेळावा

सरकारकडून धनगर समाजाची कू्रर थट्टा ः बाबासाहेब दोडतले

जामखेड/प्रतिनिधी ः चौंडी येथील उपोषण सोडून 14 दिवस झाले असले तरी सरकारने कुठलीही ठोस भुमिका व दखल घेतली नाही त्यामुळे हे सरकार धनगर समाजाची क्रुर

अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही
माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या

जामखेड/प्रतिनिधी ः चौंडी येथील उपोषण सोडून 14 दिवस झाले असले तरी सरकारने कुठलीही ठोस भुमिका व दखल घेतली नाही त्यामुळे हे सरकार धनगर समाजाची क्रुर थट्टा करत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी चौंडी येथे दसर्‍याच्या दिवशी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांनी मंगळवार 10 रोजी चौडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत तब्बल 21 दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या लेखी आश्‍वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले होते. यावेळी सरकारने 50 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र 15 दिवस होउनही अद्याप सरकारने आरक्षणा बाबत कसल्याही हालचाली केल्या नाहीत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दोडतले म्हणाले की राज्यभरातून सर्व धनगर बांधवांनी एकदिवस समाजासाठी एक आरक्षणासाठी हे घोषवाक्य घेऊन पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या चौडी येथे 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या देशातील चौंडी हे महत्त्वाचे शक्तिपीठ आहे ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव आहे. याठिकाणी धनगर आरक्षण महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथे धनगर आरक्षणाचे सिमोल्लंघन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचे आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब दांगडे म्हणाले की, सरकारने पन्नास दिवसांचा वेळ मागितला आहे. सरकार काय करतंय हे सध्या आम्हाला कळायला मार्ग नाही, सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. शासनाने निमंत्रण दिले होते ती बैठक मंबई याठिकाणी आमची झाली. शासनाने लेखी आश्‍वासन दिले आसले तरी 15 दिवस होऊनही सरकारने कसलीही दखल घेतली नाही त्यामुळे दसर्या दिवशी महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथे उपस्थित रहावे सरकारला पिवळे वादळ दिसले पाहिजे असेही दांगडे यांनी सांगितले. यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे, उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर, नितीनदादा धायगुडे, बाळा गायके, स्वप्निल मेमाणे, दिलीप गडदे, शांतीलाल नाना कोपनर, दत्ताजी काळे, किरण धालपे, सह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

एक दिवस समाजासाठी एक दिवस आरक्षणासाठी – यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना दोडतले म्हणाले की, राज्यभरातुन सर्व धनगर बांधवांनी एकदिवस समाजासाठी एक आरक्षणासाठी हे घोषवाक्य घेऊन  पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या चौडी येथे 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या देशातील चौंडी हे महत्त्वाचे शक्तिपीठ आहे ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव आहे. याठिकाणी धनगर आरक्षण महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथे धनगर आरक्षणाचे सिमोल्लंघन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बाळासाहेब दोडतले यांनी केले आहे.

COMMENTS