Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेजमजूरांच्या डोळ्यात निघाल्या अळ्या

मजुरांमध्ये घबराट ः जिल्हा रुग्णालयात मजुरांची हेळसांड

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यात वळण येथे एका शेतकर्‍याच्या शेतात कांदे काढणीचे काम करणार्‍या शेतमजुरांच्या टोळीतील बारा मजुरांच्या डो

शहरात अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग सुरू
बाळ बोठेचा मोबाईल क्रमांक अ‍ॅक्टीव्ह होण्यामागं नेमकं गौडबंगाल काय ? l Bal Bothe l Rekha jare*
संगमनेरमध्ये स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ मॅरेथॉनचे आयोजन

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यात वळण येथे एका शेतकर्‍याच्या शेतात कांदे काढणीचे काम करणार्‍या शेतमजुरांच्या टोळीतील बारा मजुरांच्या डोळ्यांतून अळींची अंडी व अळ्या निघण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मांजरी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असता येथिल प्रशासनाने या मजुरांकडे ढुंकुनही पाहिले नाही. उलट दिवसभर मजूर या ठिकाणी बसून ठेवल्याने मजुरांची हेळसांड केली आहे.या मजुरांनी पुन्हा राहुरी येथे येवुन खाजगी नेत्र रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर अजुन घाबरून जाऊ नये आहे आवाहन नेत्रतज्ञ डॉ. अभिषेक शिंदे यांनी केले आहे.
           शेतकर्‍यांच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. कांदे काढण्यासाठी एकरी बारा हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. त्यात, लवकर शेतमजूर मिळत नाहीत. अशा संकटात वळण येथे एका शेतकर्‍याच्या शेतात काम करणार्‍या शेतमजुरांच्या डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे खुपायला लागले. डोळे लाल झाले. डोळ्यातून अळी बाहेर येत असल्याचे दिसताच मजुरांमध्ये घबराट पसरली. टोळी मुकादम हिराबाई शेलार, काजल जाधव, माया बर्डे, संध्या शेलार, माया मोरे, अजय बर्डे, सुनंदा जाधव, सविता जाधव, सविता सरोदे, नारायण शिखरे, दोन लहान मुले यांना उपचारासाठी तातडीने मांजरी येथे प्राथमिक आरोग्य तेथे केंद्रात हलविण्यात आले.असा प्रकार क्वचित आढळतो. एकाच वेळी पंधरावीस जणांच्या डोळ्यात अळीची अंडी, अळ्या आढळल्या आहेत. मातीमधील परजीवी जंतू, झाडांमधील जीवजंतू मानवी शरीरावर, डोळ्यांमध्ये अंडी सोडतात. त्यांचे रूपांतर अळीमध्ये होते. त्यामुळे डोळे सुजणे, लाल होणे, चिपडणे असे प्रकार होतात. प्रत्येक मजुराने सुरक्षेसाठी चष्मे वापरावेत, असे आवाहन राहुरीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिषेक शिंदे यांनी केले आहे. शेतमजुरांच्या डोळ्यातून अळी निघण्याचा धक्कादायक प्रकार झाल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत सदर मजुरांनी मांजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला सदर रुग्ण तातडीने जिल्हा रुग्णालयात गेले सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या रुग्णांची तेथे हेळसांड झाली त्यानंतर त्यांच्यावर तेथे उपचारात होत नसल्याने सदर रुग्ण पुन्हा राहुरीच्या दिशेने माघारी आल्यानंतर त्यांना खाजगी डॉ. अभिषेक शिंदे यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार केले त्यांच्या डोळ्यातील अंडी व अळ्या सुरक्षितपणे बाहेर काढले असून सर्व रुग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. अभिषेक शिंदे यांनी सांगितलं.

पिकांचे नमुने पाठवले शास्त्रज्ञाकडे – एकाच वेळी शेतात काम करणार्‍या मजुरांना असा प्रकार झाल्याची ही घटना प्रथमच असावी सदर घटनेची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना दिली आहे. घटनास्थळाची पाहणी करून. सदर ठिकाणच्या मातीचे नमुने तसेच पिकांचे नमुने शास्त्रज्ञाकडे पाठवले जाणार असल्याचे राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ यांनी सांगितले.

COMMENTS