लोहा प्रतिनिधी - लोहा तालुक्यात गोवंशावर लंम्पी चर्मरोग आजाराच्या प्रादुर्भाव दिसुन आल्याने आजारांवर नियंत्रण करण्यासाठी तालुक्यात 100% लसीकरण

लोहा प्रतिनिधी – लोहा तालुक्यात गोवंशावर लंम्पी चर्मरोग आजाराच्या प्रादुर्भाव दिसुन आल्याने आजारांवर नियंत्रण करण्यासाठी तालुक्यात 100% लसीकरण करण्यात आले असुन बाधीत जनावरांवर उपचारा सुरु आहे पशुधन पालकांनी आपल्या पशुची काळजी घेण्यासाठी गोठा स्वच्छ व निर्जंतुकीकरण करुण गोमाशी व गेचुड यांच्या नियंत्रणासाठी जंतुनाशक फवारणी करावी असे आव्हान डॉ.पशुधन विस्तार अधिकारी डॉ.एम.आर.पुरी यांनी केले आहे.
तालुक्यात लम्मी चर्मरोग प्रार्दुभाव वाढत असल्याने तालुक्यात वरिष्ठांच्या आदेशाने तालुक्यात लसीकरणास सुरुवात करत आज पर्यंत तालुक्यात 45751 गुरांचे 100% लसीकरण पुर्णा झाले असुन आज पर्यंत 800गुराना बाधा झाली असुन त्यात 76 गुरांचा या चर्मरोगाने दगावली असुन सद्यस्थितीत लंम्पी आजा नियंत्रणात आहे अशी माहिती पशुधन विस्तार अधिकारी डॉ.पुरी यांनी दिली आहे. पशु पालकांनी आपल्या गुरांची काळजी घेण्याची गरज असुन, मलमुत्र विल्हेवाट लावून गोठा स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावा गोमाशी व गेचुडावर नियंत्रणासाठी जंतुनाशक फवारणी करावी,कोणत्याही गुरास (गोवंशास) लम्पी या चर्मरोग लक्षणे दिसुन आल्यास त्यास वेगळे करुण तात्काळ पशु वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावा उपचाराने लंम्पी हा चर्मरोगाव उपचाराने अटकाव आणता येतो असे आव्हान पशुधन विस्तार अधिकारी डॉ.एम.आर पुरी यांनी केले आहे.
COMMENTS