डॉ. अशोक सोनवणेअहमदनगर ः शिक्षण म्हणजे ज्ञानाची तहान आणि आपले शिक्षण पुढील स्तरावर नेण्याची महत्त्वाकांक्षा. जीवन हा एक शिकण्याचा अनुभव आहे आणि शिक्ष
डॉ. अशोक सोनवणे
अहमदनगर ः शिक्षण म्हणजे ज्ञानाची तहान आणि आपले शिक्षण पुढील स्तरावर नेण्याची महत्त्वाकांक्षा. जीवन हा एक शिकण्याचा अनुभव आहे आणि शिक्षण हा यातील महत्त्वाचा भाग आहे. ज्ञानाचा प्रकाश देण्या, दिवा अखंड तो जळतो । जीवनाचा अर्थ खरा, गुरूंमुळेच कळतो ॥ अशी शिक्षण आणि गुरुजनांची महती वर्णावी किती? नगरची जिल्हा परिषद सध्या शिक्षणाकडे व्यवसाय आणि गुरुजनांकडे वेठबिगार म्हणून कटाक्षाने बघत असल्याचे वास्तव समोर आले आहे. येरेकर आणि भास्कर पाटील यांनी संगनमताने शिक्षण विभागातील 43 शिक्षक दोन वर्षात निलंबित केले असून येरेकर या कारवाईत दुजाभावाची वागणूक देत असल्याचेही समोर आले आहे. निलंबनातून शिक्षकांची आर्थिक मानसिक हानी होत असली तरी यात प्रशासनाची मोठी चांदी होत आहे.
मे 2022 पासून दोन वर्षाच्या कालखंडात शिक्षण विभागातील एकूण 43 निलंबित केलेल्यांमध्ये 41 शिक्षक तर 2 विस्तार अधिकार्यांचा समावेश आहे. शिक्षकांमध्ये राजेंद्र सदगीर, आण्णासाहेब आभाळे, बद्रीनाथ चव्हाण, प्रदीप खिलारी, बाजीराव पानमंद, गणेश शेंगाळ, नितिन बोराटे, संतोष अकोलकर, जालिंदर खताळ, योगेश थोरात, राजेंद्र थोरात, संजय थोरात, संतोष खंडागळे, अनिल पराड, रमेश घुले, विजय अकालेकर, ज्ञानेश्वर माळवे, उमेश अय्या, प्रकाश मनोहर खरे पोपट फाफाळे, रमेश आहेर, प्रभाकर रोकडे, भाऊसाहेब गायकवाड, किरण रोकडे, सुनील उचाळे, राजेंद्र गर्जे, रामेश्वर काळे, प्रतिभा पाचारणे, वाजेदा शेख, गोकुळ दाताळ, अविनाश गांगुर्डे, मदन दिवे, सोमाजी मधे, कैलास दिघे, संतोष थोरात, आत्माराम देवगिरे आत्माराम, रफलबानो हुसेन सम्यद, मंदाकिनी चेडे, पालस सूर्यवंशी, एकनाथ दिघे, निवृत्ती घोडे, रामराव ढाकणे आदी शिक्षकांसह यात एक विस्तार अधिकारी एक गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश असून किरकोळ कारणावरुन भाग्यश्री म्हसे या महिलेच्या तब्बल पाच वेतनवाढ रोखल्या तर विद्युल्लता आढाव यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईतही अजून अनेकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यात अभय वाव्हळ या गटशिक्षणाधिकार्याच्या तीन वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली होती, मात्र शिक्षण आयुक्तांकडून त्यांना न्याय मिळाला. जिल्हा परिषदेने एखादा कर्मचारी निलंबित केला तर त्याला 90 दिवसात पुनःस्थापना देण्यात यावी असा जुलै 2019 चा शासन निर्णय व सर्वोच्च न्यायालयचे निर्देश असताना सुद्धा सदर कर्मचार्यांना पुनःस्थापना देतेवेळी निलंबित कर्मचार्यांना शिक्षण विभागाकडे बोली लावावी लागते. त्यातून लाखो रूपयांचा रेट लावून लिलाव केला जातो, जो कर्मचारी देणार नाही त्याला गैरसोय होईल अशा ठिकाणी घरापासून 150 ते 200 किमी अंतरावर शाळा दिली जाते, मग असा कर्मचारी अंशतः बदलासाठी गेला तर त्याच्याकडून लाखो रुपयांचा मलिदा घेतल्याशिवाय त्याची फाईल सहा महिन्यापर्यंत टेबलवरून हलत नाही. आतापर्यंत जितके शिक्षक पुर्नस्थापित झाले त्या प्रत्येकाकडून पैसे घेतल्याशिवाय त्यांना पुनःस्थापित केले नसल्याची चर्चा आहे. पैसे कमविण्यासाठी जाणीवपूर्वक निलंबनाचा उद्योग जिल्हा परिषदेत सुरु आहे. जो नियम शिक्षकांना तोच नियम अधिकारी वर्गाला व मर्जीतल्या सहायक प्रशासन अधिकारी भदगलेला येरेकर का लावत नाही?कारण करोडोंची माया यांच्यामार्फत कमवली जात आहे. पाटील व भदगले जोडीने कमवून दिलेल्या मायेच्या उतराईसाठीच कारवाई टाळली जात असावी अशी कुजबुज जिल्हा परिषद कर्मचार्यांत आहे?
कारवाईत असा होतो दुजाभाव – जालिंदर खताळ प्रभारी गटशिक्षणाधिकारी अकोले यांनी अधिकार कक्षेत नसताना शिक्षकांच्या बदल्या केल्या म्हणून 23 जानेवारी 2024 रोजी त्यांचे निलंबन केले. मात्र कायम वादग्रस्त असणार्या कोपरगावच्या महिला प्रभारी गटविकास अधिकारी शबाना शेख यांनी स्वत:चे पती व इतर शिक्षकांच्या तोंडी बदल्या करुनही त्यांना क्लीनचिट मिळाली कशी? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने येरेकरांना निवेदन देऊनही ते गप्पच असल्यामुळे कारवाईत कसा दुजाभाव होतो हे सिद्ध झाले आहे.
982225475 वर संपर्क साधावा – शिक्षण विभागातील गैरव्यवहारावर बोट ठेवल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील विविध शिक्षकांनी आम्हाला फोन करून आपल्या व्यथा आणि वेदना मांडल्या असून, शिक्षण विभागाकडून आमचा कसा छळ मांडला आहे, त्यासंदर्भात उहापोह केला. शिक्षण विभागातील या सावळ्या गोंधळावर अनेक शिक्षक आपल्या व्यथा आणि वेदना मांडण्यास इच्छूक आहेत त्यांनी 9822254475 या नंबरवर संपर्क साधावा. आम्ही त्यांचे नाव उघड न करता, त्यासंदर्भात शिक्षण विभागाला जाब विचारून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यास आम्ही बांधील आहोत.
COMMENTS