शिर्डी प्रतिनिधी - नाशिक पुणे हायवेवर चंदनापुरी ते घारगाव दरम्यान महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी ’ई’ चलनाद्वारे मोटार मालकांची होणारी लूट थांबवावी
शिर्डी प्रतिनिधी – नाशिक पुणे हायवेवर चंदनापुरी ते घारगाव दरम्यान महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी ’ई’ चलनाद्वारे मोटार मालकांची होणारी लूट थांबवावी या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे राहाता येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाबळे(Rajendra Wable) यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात वाबळे यांनी म्हटले आहे की, नाशिक पुणे हायवेवर चंदनापुरी ते घारगाव दरम्यान महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी वेग तपासणी यंत्र बसविलेले आहे. सदर वेग तपासणी यंत्र बसवलेली गाडी रस्त्याच्या कडेला लपवून उभी केलेली असते हे यंत्र मोटार वाहनांचा वेग तपासणी करते व जास्त वेगाने चालणार्या वाहनांना इ चलनाद्वारे प्रत्येकी 2 हजार रुपये दंड भरण्याचा मेसेज येतो व वाहनधारकांच्या मालकाचे बँक खात्यावरून पैसे वजा होतात. नाशिक पुणे हायवेवर चंदनापुरी ते डोळासने,बोटा घारगाव या रस्त्यावर अति वेगाने जास्त अपघात घडल्याचे घटना नाही जर अति वेगाने वारंवार अपघात होत असेल तर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावे. आजच्या धावपळीच्या युगात 90 ते 100 चा मोटार वाहनाचा वेग म्हणजे फार काही नाही महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांनी सदरच्या ठिकाणी वेग नियंत्रण तपासणी गाडी लावू नये. विनाकारण वाहन मालकांना 2 हजार रुपयाचा उदंड भरावा लागतो वेग नियंत्रणाचे कसलेही फलक रस्त्यावर लावलेले नाहीत. वेग नियंत्रण मशीन पुढे लावल्याची सूचनाफलक ट्राफिक पोलिसांनी लावलेला नाही गुपचूप पणे मोटार मालकांच्या वर दरोडा टाकण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे याबाबत मत आहे.या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे राहाता येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. ट्राफिक जाम मध्ये तासनतास वेळ वाया जातो तो वेळ कव्हर करण्यासाठी मोकळ्या रस्त्याच्या ठिकाणी वाहन चालक ती वेळ कव्हर करण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या जीवाची काळजी प्रत्येकाला असतेच मात्र अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दंड वसुलीचा प्रकार निंदनीय असल्याचे वाबळे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सविस्तर निवेदन दिलेले आहे.
COMMENTS