Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिहीर शहाविरोधात लूक आऊट नोटीस

परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय

मुंबई ः वरळीतील हिट अ‍ॅड रन प्रकरणानंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिस मिहीर शहाचा शोध घेत आहेत. मात्र आरोपीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आह

हतेडी बु. येथिल अवैध दारूविक्री बंद करा
राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचे निलंबन
विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत

मुंबई ः वरळीतील हिट अ‍ॅड रन प्रकरणानंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिस मिहीर शहाचा शोध घेत आहेत. मात्र आरोपीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे. रविवारी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाहने एका महिलेला आपल्या महागड्या गाडीने चिरडले. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या उपनेत्याला अटक केली आहे. पण, अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेला शिवसेना उपनेत्याचा मुलगा आणि अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह मात्र अद्याप फरार आहे. आता मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
वरळी हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मिहीर शाह 24 तासांपासून फरार आहे. या प्रकरणात त्याचे वडील राजेश शहा आणि चालक यांना अटक करण्यात आली आहे. मिहीरच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना झाली असून तो परदेशात पळून जाणार असल्याचा संशय पोलिसांना आहे. मिहीर शाह अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं पाठवली आहेत. पोलिस तपासांत समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे, वरळी अपघातापूर्वी मुख्य आरोपी मिहीर शाहने आपल्या चार मित्रांसोबत मद्यप्राशन केले होते. 18 हजार 730 रुपये त्यांचे बिल झाले होते. पोलिसांनी सीसीटिव्हीचा डीव्हीआर जप्त केला असल्याची माहिती जुहूतील बार मालकाने दिली आहे.

COMMENTS