Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरांची चौकशी

मुंबई : कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून या कोविड काळातील खिचडी घोटाळ

अमोल किर्तीकरांना ईडीचे दुसरे समन्स
ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स
अमोल किर्तीकर यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स

मुंबई : कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून या कोविड काळातील खिचडी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांची मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली. खिचडी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या कंत्राटदार कंपनीकडून अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात कंत्राटदार कंपनीकडून मोठी रक्कम जमा झाली असल्याचे तपासात आढळले असल्याची माहिती मुंबई पोलिसांमधील सूत्रांनी दिली. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. तर अमोल किर्तीकर हे खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. खासदार किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही युवासेनेचे पदाधिकारी आहेत. अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण या दोघांनीही आपला राजकीय प्रभाव वापरून मुंबई महापालिकेच्या खिचडीचे कंत्राट मिळवून देण्यासाठी ठेकेदारांना मदत केली असल्याचा संशय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला आहे. कंत्राटदार नियमानुसार पात्र नव्हते. तरीही त्यांनाही कंत्राट देण्यात आले होते. खिचडी घोटाळा प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या फोर्सवन मल्टी सर्विसेस या कंपनीच्या खात्यातून आले सूरज आणि अमोल यांना पैसे पाठवण्यात आले. फेब्रुवारी 2021 ला यांच्या खात्यात पैसे आल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे. अमोल आणि सूरज हे दोघेही सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत.

COMMENTS