बेलापूर/प्रतिनिधी ः मृत्यू हे सत्य आहे, हे लक्षात ठेवून, जीवन जगतांना देशासाठी, धर्मासाठी आणि कर्मासाठी जगा. जगायचेच असेल तर छत्रपती शिवाजी महारा

बेलापूर/प्रतिनिधी ः मृत्यू हे सत्य आहे, हे लक्षात ठेवून, जीवन जगतांना देशासाठी, धर्मासाठी आणि कर्मासाठी जगा. जगायचेच असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगणे जगा असे अवाहन ह.भ. प.सोपान महाराज कन्हेरकर यांनी केले.छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने ह.भ.प. सोपान महाराज कन्हेरकर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन जे.टी.एस. हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीष मुथा हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेश खटोड हे होते. या वेळी जमलेल्या शिवप्रेमींना संबोधीत करताना ह.भ.प. कन्हेरकर महाराज म्हणाले की, या देशात रहायचे असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल. वंदे मातरम म्हणावेच लागेल या देशात जन्मलेला प्रत्येक जण हिंदुच आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या स्वप्नासारखे जगा विश्व बंधुत्व ही भावना ठेवा आपण आपल्या माता पित्याचे, या मातीचे, या गावाचे ,देशाचे देणे लागतो याचे भान ठेवा. देवाने विनामूल्य दिलेल्या या देहाचा सदउपयोग करा. आत्मा व परमात्म्याचे मिलन म्हणजे राम आहे. शरीरात राम आहे तो पर्यत आपण आहोत. संस्कार व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. या दोन्ही बाजु सांभाळल्या पाहीजे. जपल्या पाहीजे. माता पित्यांची कमाई मौज मजा करण्यात उधळू नका. स्वतःतोंड गोर करण्याच्या नादात, स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या नादात आई वडीलांच्या तोंडाला काळ फासु नका. प्रेम करायच तर ते आई वडीलावर या देशावर करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी केले तर सूत्रसंचलन अभिजीत राका यांनी केले शेवटी छत्रपती तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल माळवदे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल खैरे, रोहीत शिंदे, स्वप्नील खैरे, राम भोसले, विकी माळवदे, निखील पुजारी ,किरण माळवदे, शुभम पारखे, अमोल मेहेत्रे, मनोज माळवदे, ओंकार साळूंके आदिनी विशेष प्रयत्न केले.
COMMENTS