Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तणावमुक्त जीवन जगत नियमित व्यायाम केल्यास ह्र्दय विकाराचा धोका टळू शकतो:- डॉ.जगदीश हिरेमठ

पाथर्डी प्रतिनिधी - आयुष्यातील ताण तणावामुळे ह्र्दय विकाराचा आजार होऊ शकतो यावर उपाय म्हणून योगा,ध्यानधारणा,व्यायाम,आहार,मित्रांशी संवाद या गोष्

एकता फौंडेशनच्यावतीने शुक्रवारी ‘जॉब फेअर’चे आयोजन
अकोल्यात वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू
नगरच्या बालगृहातून अल्पवयीन मुलाचे झाले अपहरण…

पाथर्डी प्रतिनिधी – आयुष्यातील ताण तणावामुळे ह्र्दय विकाराचा आजार होऊ शकतो यावर उपाय म्हणून योगा,ध्यानधारणा,व्यायाम,आहार,मित्रांशी संवाद या गोष्टींचा जीवनात नियमित समावेश केल्यास आपण या आजारापासून दूर राहू असे प्रतिपादन जेष्ठह्र्दयरोग तज्ज्ञ डॉ.जगदीश हिरेमठ यांनी केले.ते शनिवारी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएन { निमा } व श्री रेणुकामाता मल्टीस्टेट बँकेच्या संयुक्त विद्यमाने  “निरामय जीवन” या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

             यावेळी आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे,डॉ. प्रशांत भालेराव,डॉ. अभय भंडारी,डॉ. सुहास उरणकर,डॉ.श्रीधर देशमुख,डॉ. सचिन गांधी,डॉ. मृत्युंजय गर्जे,डॉ. नितीन खेडकर,डॉ. दीपक देशमुख,डॉ. ज्ञानेश्वर दराडे,डॉ. रणजित वाघ,डॉ. संदीप पवार,डॉ. भाऊसाहेब लांडे, डॉ. अमोल शिरसाठ,डॉ. अमोल वाघचौरे,डॉ.सागर भापकर, डॉ. मनीषा खेडकर,डॉ.मनीषा देशमुख,डॉ.ज्योती देशमुख,डॉ.सोनाली भंडारी,डॉ.पूर्वा उरणकर,डॉ. अंबिका वाघ हे उपस्थित होती.

पुढे बोलताना डॉ. हिरेमठ म्हणाले की,समृद्धी वाढली तशी जीवनशैली बदलत चालली असून विविध आजारांनी आपल्याला घेरले आहे.आपण मुलांना कसे खायचे शिकवतो मात्र काय खायचे हे शिकवत नाही.जीवनात अंगी शिस्त,वेळेचे नियोजन करत कामाबरोबरच व्यायाम केला,धूम्रपान टाळले व तणावमुक्त जगल्यास आपण निरोगी राहू.तसेच वाढत्या प्रदूषणामुळे सुद्धा आता ह्र्दयविकाराचा आजार होऊ शकत असल्याने प्रदूषण होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यायला हवी.असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मृत्युंजय गर्जे सूत्रसंचालन डॉ.श्रीधर देशमुख ते आभार डॉ. सुहास उरणकर यांनी मानले.

COMMENTS