Homeताज्या बातम्याविदेश

ट्विटरच्या नवीन सीईओपदी लिंडा याकारिनो यांची नियुक्ती

टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची ट्विटरच्या नवीन सीईओपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर नवीन सीईओ याकरिनोने एलन मस्कसाठी ख

भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात.
शिक्षकाने बनवला ५०० गॅझेट्सचा “आयसीटी गणेशा”

टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची ट्विटरच्या नवीन सीईओपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर नवीन सीईओ याकरिनोने एलन मस्कसाठी खास ट्विट केले. यामध्ये तिने मस्कचे विशेष कौतुक केले आहे. याकारिनो जाहीरपणे बोलण्याची पहिलीच वेळ होती. इलॉन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वीच ट्विटरची मालकी मिळवली होती. त्यांनी शुक्रवारी ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याकारिनो यांच्या नियुक्तीची घोषणा केली. मस्कचे आभार मानताना, याकारिनो यांनी ट्विट केले, “उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या तुमच्या दृष्टीकोनातून मला खूप दिवसांपासून प्रेरणा मिळाली आहे. ही दृष्टी ट्वीटरवर आणण्यासाठी आणि या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मी मदत करण्यासाठी उत्साहित आहे.” तर ही लिंडा याकारिनो आहे तरी कोण?लिंक्डइन प्रोफाइलनुसार, लिंडा याकारिनो 2011 पासून NBC युनिव्हर्सलमध्ये आहेत. अध्यक्ष, ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप म्हणून काम करत आहेत. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागातही काम केले आहे.

COMMENTS