Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुनी पेन्शन साठी क्रांतीची ज्योत पेटवा – प्रा किसन चव्हाण

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी -  भारतीय स्वतंत्र्य आंदोलनात महात्मा गांधींनी भारतीय जनतेला करेंगे या मरेंगे असा नारा दिला आणि कन्याकुमारी पासून काश्म

भविष्यात पुन्हा युती होईल का याचे काळच उत्तर देईल : रविंद्र बोरावके यांचे सूतोवाच
इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला चालविण्याचा आदेश रद्द
अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्यातील पह‍िली ‘ई-बस’

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी –  भारतीय स्वतंत्र्य आंदोलनात महात्मा गांधींनी भारतीय जनतेला करेंगे या मरेंगे असा नारा दिला आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत क्रांतीची ज्योत पेटवली त्याचप्रमाणे आज जुनी पेन्शन साठी सर्व घटकातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संघर्ष करणे कर्म प्राप्त ठरले आहे. पंजाब हरियाणा चंदीगड येथील शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे एकत्रित येऊन शेतकरी विरोधी कायदा रद्द करायला सरकारला भाग पाडलं त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांची एकजूट पेन्शन मिळून देऊ शकते असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चा समोर बोलताना केले आज संपाच्या चौथ्या दिवशी शेवगाव पंचायत समिती ते शेवगाव तहसील कार्यालय या मार्गावर वंचित सरकारी निमसरकारी घटकांनी पायी मोर्चा काढला मोर्चामध्ये हजारो कर्मचारी बंधू भगिनी सहभागी झाले होते एकच मिशन जुनी पेन्शन ,पेन्शन आमच्या हक्काचे नाही ,कुणाच्या मालकीचे ,हम सब एक है ,अशा घोषणा देत निघालेला मोर्चा स्व गोपीनाथ मुंडे चौक ,संत गाडगेबाबा चौक आणि नंतर शेवगाव तहसील कार्यालयात येवून सभेमध्ये रुपांतरीत झाला यावेळी झालेल्या सभेप्रसंगी कॉम्रेड संजय नांगरे ,शिक्षक भरतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख,बँकेचे संचालक रमेश गोरे, ग्रामसेवक संघटनेचे मच्छिंद्र भापकर श्रीमती शीला अभंग भाऊसाहेब पाचरणे, नरसाळे भाऊसाहेब, काळे भाऊसाहेब,  कल्याण मुटकुळे यांची भाषणे झाली प्रारंभी मोर्चा सुरू होण्यापूर्वी मोर्च्याची पार्श्वभूमी व प्रास्ताविक शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यवाहक व समन्वय समितीचे संजय भुसारी यांनी केले .समन्वय समितीचे अध्यक्ष टी डी एफ चे नेते अशोक नवल, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, माध्यमिक सोसायटीचे संचालक सत्यवान थोरे,शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष  सुरेश विधाटे,एन सी शिंदे,,बाळासाहेब पाचर्णे, राजेंद्र फरताळे प्रवीण काजळे प्रशांत बरबडे किशोर पवार सचिन पाटील विठ्ठल खर्चन गणेश बोडके हरिभाऊ शेळके संदीप जाधव भाऊसाहेब पाचरणे ज्ञानेश्वर सोंडे राजेंद्र आहेर श्रीमती मीनाक्षी काकडे, सोमनाथ रेवडकर एस ए शेख, विक्रम खैरे यांच्या सह विविध विभागांचे शेकडो  कर्मचारी महिलाची उपस्थिती  लक्षणीय होती.

COMMENTS