Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार 

नाशिक: रियल लोकेशन्स, मालिकेची कथा आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच मालिकेद्वारे नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. कलर्स मराठीवर सुरु झालेली कस्तुर

माजी खा. राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा आज सांगलीत
कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकासाची घौडदौड सुरूच
ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत

नाशिक: रियल लोकेशन्स, मालिकेची कथा आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच मालिकेद्वारे नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. कलर्स मराठीवर सुरु झालेली कस्तुरी हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे. जीव झाला येडापिसा मालिकेतील शिवा दादा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि आपल्या सगळ्यांची लाडकी एकता लब्दे. या दोघांची जोडी भलतीच लोकप्रिय होताना दिसून येत आहे.त्यांच्यातील अबोल नातं, होणाऱ्या भेटीगाठी, त्यांच्यातील संवाद प्रेक्षकांना आवडत आहे. कस्तुरी मालिकेत भाऊ बहिणीची सुंदर गोष्ट बघायला मिळत आहे. कस्तुरीच्या पात्राला अनेक कंगोरे आहेत… ती कधी घरासाठी ढाल म्हणून उभी राहते, तर कधी भावासाठी मायेची सावली, तर कधी भावाला आधार देणारी, त्याचे  योग्य वेळी कान धरणारी आई. समर अत्यंत महत्वाकांक्षी, काहीसा स्वार्थी, पण काहीतरी चांगलं करून धाकवण्याची ईच्छा असलेला कुबेर घराण्याचा मुलगा आहे. दोघांच्या राहणीमानात, व्यक्तिमत्वात, त्यांच्या दृष्टिकोनात खूप फरक आहे पण तरीदेखील प्रेक्षकांना कस्तुरी आणि समरची जोडी पसंतीस पडली आहे यात शंका नाही.जाणून घेण्यासाठी बघा “कस्तुरी” दररोज  रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. आपल्या भूमिकेविषयी बोलताना एकता म्हणाली, “पहिल्यांदा विचारणा झाली तेव्हा मनामध्ये धाकधूक होती. पण आता मला कस्तुरी साकारताना खुप भारी वाटतंय. मुळात एकदम साधं राहणीमान, आपल्यातलीच एक वाटणारी, नॉर्मल कपडे त्यामुळे सगळचं वेगळ आहे. माझ्यासाठी पहिलीच मालिका आहे ही ज्यात मी देव साकारत नाहीये, पौराणिक मालिका माझ्या खुप जवळचा विषय आहे

COMMENTS