Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप

पुणे/प्रतिनिधी ः नालासोपारा येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा मृतदेह बॅगेत भरुन पुणे - मुंबई रेल्वे मार्गावरील तळेगा

जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
भाषेच्या सामन्यकरणातूनच साहित्याचा जन्म होतो- डॉ.शरद  बावीस्कर
मालधक्क्यावरील ठेकेदारांकडून जिल्हाधिकार्‍यांची दिशाभूल ; माथाडी कामगारांचा दावा, समक्ष पाहणीचे केले आवाहन

पुणे/प्रतिनिधी ः नालासोपारा येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा मृतदेह बॅगेत भरुन पुणे – मुंबई रेल्वे मार्गावरील तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर टाकून दिल्या प्रकरणी तीनजणांना विशेष न्यायाधीश जे. जी. डोलारे यांचे न्यायालयाने शुक्रवारी मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दिलेल्या शिक्षेत आरोपींना सामूहिक बलात्कार प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप, अपहरण प्रकरणी पाच वर्ष कैद, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्ष कैद व प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. राहुल रविंद्र बरई (वय-29), ईशान हमजान अली कुरेशी (29) व संतोष विष्णु जुगदर (29, तिघे रा. वडाळा, मुंबई) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर मे 2014 मध्ये एका लाल रंगाच्या बॅगेत पोलीसांना मुलीचा मृतदेह मिळून आला होता. त्यानंतर पोलीसांनी तपास केला असता, सदर आरोपींपैकी संतोष जुगदर मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. संतोष हा गुन्हेगार होता व त्याच्यावर खून, चोरीचे गुन्हे दाखल आहे. तो या मुलीस त्याचा मित्र राहूल याच्या घरी नेले होते. त्याठिकाणी आरोपींनी मुलीस आर्थिक व्यवहाराच्या गुन्ह्यात मदत करण्यास सांगितले. परंतु त्यास मुलीने नकार दिला. त्यामुळे तीन आरोपींनी संगनमताने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह नष्ट करण्यासाठी तो एका बॅगेत भरला. कॅबने तो मृतदेह मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर आरोपींनी आणला. तेथून आरोपी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर येवून त्यांनी मृतदेह असलेली बॅग त्याठिकाणी आडबाजूला सोडून पळ काढला होता. विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी याप्रकरणात आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. तर या खटल्यात विशेष सरकारी वकील वामन कोळी यांनी देखील कामकाज पाहिले.

COMMENTS