Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करूया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर

लातूर प्रतिनिधी - महसूल विभाग हा प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे त्यामुळे शासनाच्या सर्वाधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी या विभागाक

भविष्य सांगणार्‍या पोलिसाचेच…भविष्य अंधारात
Sangali : मिरज शहर सुधार समितीची जिल्हा न्यायालयाकडे मागणी (Video)
शेवगाव तहसीलमध्ये शेतकर्‍यांचे शिवपाणंद रस्तेप्रश्‍नी आंदोलन

लातूर प्रतिनिधी – महसूल विभाग हा प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे त्यामुळे शासनाच्या सर्वाधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी या विभागाकडे असून सर्वसामान्य जनतेच्या जीवनाला स्पर्श करणारा हा विभाग आहे. यामुळे महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून संवेदनशीलपणे आणि संवादात्मक होऊन एकोप्याने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. महसूलदिनी लातूर येथील भक्ती-शक्ती मंगल कार्यालयात आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कृष्णा चावरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले,डॉ. सुचिता शिंदे, गणेश महाडिक, नितीन वाघमारे, प्रियांका कांबळे, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, रोहिणी न-हे-विरोळे, प्रवीण फुलारी, प्रतीक्षा भुते, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, सर्व तहसीलदार या वेळी उपस्थित होते.
निवडणूक ते नैसर्गिक आपत्ती या प्रत्येक बाबतीत महसूल विभागाची प्रमुख भूमिका आहे. सर्वसामान्य जनतेला योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यालयात समस्या घेऊन येणा-या नागरिकांशी सुसंवाद ठेवून, त्यांची तक्रार केवळ कागद म्हणून न वाचता ती तक्रार मानवी दृष्टीकोन ठेवून समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. ‘संवादात्मक आणि संवेदनशील प्रशासन’ अशी प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रशासनाची जनतेच्या मनातील प्रतिमा उंचावणे, हाच आपल्यासाठी खरा पुरस्कार असेल, अशी भावना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी या वेळी व्यक्त केली.  विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण जिल्ह्यात महसूल सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी पत्र, शिधापत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीचे धनादेश, मतदार ओळखपत्र आदी बाबींचा यामध्ये समावेश होता तसेच तलाठी संवर्गातील कर्मचा-यांना स्थायित्व प्रमाणपत्राचेही या वेळी वितरण करण्यात आले. उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महसूलदिनी सन्मान करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांचा निवडणूक कामकाजात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार संवर्गातील कुलदीप देशमुख, सुरेश पाटील, संतोष गुट्टे, धनेश दंताळे, रंगनाथ कराड यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. या सोबतच लघुलेखक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी, वाहन चालक, शिपाई आणि कोतवाल संवर्गातील कर्मचा-यांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दीपप्रज्ज्वलन आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रास्ताविकात महसूल विभागाने गेल्या वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भूमि अभिलेख कार्यालयासह इतर शासकीय विभागांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते.

COMMENTS