गणेशनगर प्रतिनिधी ः कोरोना काळात घर मोलकरीण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तेव्हा मोलकरीण संघटनेने संपूर्ण राज्यात लढा उभारून मोल करणींना दह
गणेशनगर प्रतिनिधी ः कोरोना काळात घर मोलकरीण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तेव्हा मोलकरीण संघटनेने संपूर्ण राज्यात लढा उभारून मोल करणींना दहा हजार रुपये प्रत्येकी मदत मिळवून दिली. या पुढील काळात देखील मोलकरीण करत असलेल्या कामाची शासनाने दखल घ्यावी, वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना पेन्शन सुरु करावी असे अनेक प्रश्न आहेत याचा पाठपुरावा संघटना करीत आहे. वेळ पडलीच तर संपूर्ण महाराष्ट्रात मोलकरी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी संघर्ष करेल राज्यभर आंदोलन उभे केले जाईल अस प्रतिपादन कॉम्रेड बबली रावत यांनी केले.
अहमदनगर जिल्हा घर मोलकरीन संघटनेचा भव्य मेळावा संत सेना महाराज मंदीरात असंख्य घर मोलकरीण यांच्या उपस्थित नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी लताताई डांगे होत्या. आपल्या मुख्य भाषणात ऑल इंडिया मोलकरीन संघटनेच्या जनरल सेक्रेटरी यांनी देशातील मोलकरणींन साठी करत असलेल्या कामाची सविस्तर माहीती दिली. युनायटेड कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सेक्रेटरी प्रा. कॉ. एल एम डांगे यांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या वेळेस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) संघटनेच्या राज्य कार्य कारनीवर निवड झालेल्या पदाधीकारी यांचा कॉ. बबली रावत व लताताई डांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळेस राज्यकारनी सदस्य कॉ. जयश्री नितीन गुरव कॉ उषा अडांगळे कॉ. सविता धापटकर यांनी आयटक संघटनेमुळे आम्ही करत असलेल्या आशा वर्कर कामात कसा आम्हाला फायदा मिळाला याचे अनुभव सांगितले. या वेळी ग्राम पंचायत कर्मचारी कॉ. मारुती सावंत बिडी कामगार फेडरेशनचे कॉ निवृत्ती दातीर लाल बावटा कामगार युनियनचे सतिष पवार बिडी फेडरेशनच्या उपाध्यक्ष कॉ भारती न्यालपेल्ली यांचा कॉ. बबली रावत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक व आरोग्य संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसल यांनी आशा व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढीसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मएकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेला मिटींग ची सविस्तर माहीती दिली लवकरच आशांना गोड बातमी समजेल असे त्यांनी सांगितले. आयटक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी व राष्ट्रीय कौन्सिल सदस्यपदी कॉ. अँड. सुधीर टोकेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल कॉ. बबली रावत व कॉ. राजू देसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मोलकरीण संघटनेच्या राज्य अध्यक्ष कॉ. सुशीला यादव या प्रकृती अस्वास्थामुळे कार्यक्रमास उपस्थीत राहु शकल्या नाही परंतु त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन आशा गट प्रवर्तक संघटनेचे जील्हा संघटक व नुकतीच आयटक संघटनेच्या कोल्हापूर मध्ये झालेल्या राज्य अधिवेशनात राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त केलेले कॉ. सुरेश पानसरे यांनी केले. होते तर त्यांना मोलाचे सहकार्य विनायक तुपे कॉ. उज्वला तुपे मिनाक्षी तुपे श्रीमती नंदा भारस्कर श्रीमती मिराबाई तुपे कॉ. सुनिता तुपे आशा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष कॉ. सविता धापटकर जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. अश्विनी गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार नेते कॉ. बाबा शेख यांनी केले तर आभार अँड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी मानले.
COMMENTS