Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेला आणखी फजिती करू

मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

जालना ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहे. यावेळी माध्यमांशी बोलतां

एकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही : जरांगे यांचे मत
मनोज जरांगे यांचे उपोषण पुन्हा सुरू
मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात

जालना ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा देत म्हटले आहे की, लोकसभेला फजिती कमी झाली, मात्र विधानसभेला आणखी जास्त होईल असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगेयांना मराठा समाजाला सगेसोयर्‍यांचे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण  मिळावे, यासाठी 8 जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले होते. सोमवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयर्‍यांचे आरक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.  आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील. उपोषणाच्या काळातच सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नंतर नको. अन्यथा सरकारला आमचा रोष परवडणारा नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले होते. शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीत मी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलो होतो. त्यावेळी आमची मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. यावर लवकरच आम्ही तोडगा काढू, असे अजित पवार यांनी म्हटले होते. याबाबत जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, मी पहिल्यापासून तेच तर सांगतोय. आम्हाला राजकारण करायचं नाही. आमची लेकरं मोठी झाली पाहिजेत. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
 

COMMENTS