मेष :- शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची
मेष :- शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी. शुभ रंग नारंगी शुभ अंक ९
वृषभ – मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. शुभ रंग काळा शुभ अंक ७
मिथुन – कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. मित्रांशी वाद घालू नयेत. शुभ रंग पिवळा शुभ अंक ५
कर्क – आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील. शुभ रंग निळा शुभ अंक १
कन्या – आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.शुभ रंग लाल शुभ अंक ४
तूळ – स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल. शुभ रंग जांभळा शुभ अंक ६
वृश्चिक – पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला. शुभ रंग विटकरी शुभ अंक २
धनू – घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी. शुभ रंग पोपटी शुभ अंक ८
मकर – स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. शुभ रंग गुलाबी शुभ अंक ७
कुंभ – जुन्या विचारात गुंतून राहू नका. आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. मानसिक शांतता जपावी. शुभ रंग पांढरा शुभ अंक १
मीन – आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. जुने मित्र भेटतील. शुभ रंग लाल शुभ अंक ४
COMMENTS