Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकांचे कैवारी बनणाऱ्यांची प्रतिमा येणाऱ्या निवडणुकीत सर्वांसमोर आणू ; खासदार डॉ. सुजय विखे

पाथर्डी प्रतिनिधी - अडीच वर्षे सत्ता असताना ज्यांना तुमच्या प्रश्नांची जाणीव झाली नाही.त्यांना अचानक तुमच्याबद्दल  समर्पणाची भावना जागृत झ

गणेशची सत्ता गेली तरी ऋणानुबंध कायम ः खासदार डॉ. विखे
नवमतदारांनी केले खासदार डॉ.सुजय विखे स्वागत
मताच्या लाचारीसाठी विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही – खासदार डॉ.सुजय विखे

पाथर्डी प्रतिनिधी – अडीच वर्षे सत्ता असताना ज्यांना तुमच्या प्रश्नांची जाणीव झाली नाही.त्यांना अचानक तुमच्याबद्दल  समर्पणाची भावना जागृत झाली.अशी काय गोष्ट झाली हा प्रश्न पडतो.कोणी रस्ता केला,श्रेय कोणाचं,कोणी काय केलं याचे उत्तर भाषणांतून देणार नाही.तर येणाऱ्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकामध्ये राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या प्रत्येक गावांमध्ये भारतीय जनता पार्टीला ७० टक्के मतदान पडणार हे या प्रश्नाचे उत्तर असेल.सुजय विखे काय करू शकतो हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही.माझं कर्तृत्व हे कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचेल.विखे कुटुंबाचे जुने सहकारी तथा जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती अर्जुनराव शिरसाट यांच्या ६१ व्या अभिष्टचिंतनप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते.याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,गोकुळ दौंड,बंडू बोरुडे,यांच्यासह समस्त पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच अर्जुनराव शिरसाट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान पाथर्डी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना विखे यांनी म्हटले की,गोरगरीब जनतेसमोर लोकांचा कैवारी म्हणून प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्याची प्रतिमा येणाऱ्या निवडणुकीत सर्वांसमोर आणू.रस्त्याच श्रेय कोणाचं यावर मला कोणाबद्दल बोलायचं नाही.मागच्या एक महिन्यात उपाशी राहून पण माणूस कसा ताजा राहू शकतो याचे उदाहरण जिल्ह्यांनी पाहिले आहे.

अनेक लोक कधीही पहा प्रत्येक व्हिडिओत आणि फोटोत फोनवर दिसतात.एवढा वर्षांच्या राजकारणाच्या प्रवासात या तालुक्यासाठी आणि सर्वसामन्यासाठी आम्ही काय केलं,आम्ही काय करू शकतो याचं ढोंग घेणं आम्हाला जमलं नाही.पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेसमोर खरे चेहरे आणणे ही काळाची गरज आहे.योग्य वेळी त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची क्षमता आपल्यात आहे.वडील महसूल मंत्री झाल्यावर अनेक लोक म्हटले की यांना दिल्लीत किंमत नाही त्यांना पाच दिवसांपूर्वीचे फोटो दाखवा.देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना उजळा दिला.हे कार्य विखे पाटील परिवाराच नगर जिल्ह्यासाठी आहे.नाव घ्यायला मी कोणाला घाबरत नाही.ज्यादिवशी ठोकण्यावर येईल त्यादिवशी नाव घेऊन ठोकेल ही ताकत सुजय विखे मध्ये आहे.कोणाचं नाव का घ्यायचं कोणी लागून गेलं,कोण लागून गेलं,काय कार्य आहे,काय केलं पाथर्डी तालुक्यासाठी आपण कोणाला घाबरत नाही,मोठमोठ्या लोकांना सोडलं नाही आपण त्यांच्या मोठ्या लोकांना पाडून दाखवण्याचं चॅलेंज दिल होत.चुकीच्या लोकांना मोठं करून नका.हे लोकं नगर जिल्ह्यांची पिढी दुषित करणारे लोक आहेत. ज्यांना आज तुमच्या तालुक्याचा पुळका आला त्यांच्या अडीच वर्षे सत्ता कार्यकाळात शेवागमधील रस्ता,मिरी-तिसगाव रस्ता खराब झालेले असताना ते कुठे होते.

नेत्याची ओळख कार्यकर्ता करतो. अर्जुनराव शिरसाट (भाऊराव) यांनी आपल्या कामातून विखे पाटील कुटूंबाचे नाव कलंकित होऊन दिले नाही याचा सार्थ अभिमान त्यांना स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्याशिवाय कोणी ओळखू शकले नाही.त्यांच्या सारखा गोरगरिबांसाठी झटणारा निस्वार्थी कार्यकर्ता आणि संघटना मिळणं हे आमच्या पन्नास वर्षाच्या राजकरणाचे फलित आहे.येणारा काळात थांबायचं नाही.येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक संस्थेत फडकवुन पाथर्डी तालुकाक्सह विकास करू असे मत व्यक्त केले.एकनिष्ठ कार्यकर्ते घेऊन पुढे जाणार असे मत व्यक्त केले.

COMMENTS