कै. श्रीमंत बाळराजे चषक 2026 क्रिकेट स्पर्धाऔंध / वार्ताहर : औंध गावाला समृध्द वारसा आहे. ऐतहासिक व धार्मिक परंपरा असलेल्या औंध यात्रेला गौरवशाली परं
कै. श्रीमंत बाळराजे चषक 2026 क्रिकेट स्पर्धा
औंध / वार्ताहर : औंध गावाला समृध्द वारसा आहे. ऐतहासिक व धार्मिक परंपरा असलेल्या औंध यात्रेला गौरवशाली परंपरा आहे. औंध यात्रा कमिटीने भरविलेले सर्वच कार्यक्रम उत्तम असून औंधची गौरवशाली परंपरा जपण्याचे काम आपण सर्वांनी करूया असे मत मुंबई पोलीस अधीक्षक बाळसिंग रजपूत यांनी व्यक्त केले.
औंध येथे यात्रेनिमित्त कै. श्रीमंत बाळराजे चषक 2026 क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते यावेळी हणमंतराव शिंदे, योगेश फडतरे, शुभम शिंदे, अमर देशमुख, संजय निकम, दीपक नलवडे, शहाजी यादव, विनोद थोरात, प्राचार्य श्रीकांत भंडारे, सदाशिव घाडगे, सागर यादव, प्रा. प्रमोद राऊत, सदाशिव पवार, संजय भोसले, संजय जाधव, दीपक कदम, गणेश देशमुख, सुखदेव इंगळे, तानाजी इंगळे, अनिल माने, रोहित मगर, बाबाराजे नांदूगडे, रमेश यादव, विक्रम शिंदे, वैभव सावंत, ऋषिकेश खैरमोडे, विशाल शिंदे, प्रशांत पवार, समशेर खान आदीसह प्रमुखांची उपस्थिती होती.
बाळसिंग रजपूत म्हणाले, तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी. सशक्त बलदंड युवा पिढी निर्माण व्हावी यासाठी आपण प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सर्व क्षेत्रात सहभाग घेणे आवश्यक आहे. तरुण पिढीला आकर्षित करणारे क्रिकेट व मॅरेथॉनसारखे कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहेत.
हणमंतराव शिंदे म्हणाले, स्व. बाळराजे यांना खेळाची व व्यायामाची खूप आवड होती. त्यांचा वारसा जपण्याचे काम येथील तरुण पिढी करीत आहे ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद राऊत यांनी केले.


COMMENTS