मुंबई : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत असतांनाच, लॉकडाऊन लागेल का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असतांनाच, आरोग्यमंत्री रा
मुंबई : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत असतांनाच, लॉकडाऊन लागेल का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असतांनाच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नांचे उत्तर देतांना म्हटले आहे की, राज्यात निर्बंध वाढतील, मात्र लॉकडाऊन लागणार नाही. मात्र संसर्ग खूपच वाढला आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कन्झ्मशन होऊ लागले, की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे लॉकडाऊन बाबत गैरसमज ठेवू नका, असेही ते म्हणालेत. लॉकडाऊनची सध्यातरी शक्यता नाही, मात्र निर्बंध अधिक कडक होतील, असे देखील राजेश टोपे यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोना परिस्थिती गंभीर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा 12 ते 15 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 11 टक्क्यांवरही जाऊन आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा आपोआपच लॉकडाऊन लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात शुक्रवारी 8,067 नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. यात मुंबईतील पाच हजार 428 नवीन बाधितांचा समावेश आहे. यावरून राज्यात नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसभरात 1,766 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात आठ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ओमायक्रॉनबाधित चार रुग्ण आढळले असून ते वसई-विरार, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि पनवेल परिसरात प्रत्येकी एक बाधित आहे. ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 972 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 5 लाख 74 हजार 859 इतकी झाली. दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 11 हजार 620 पर्यंत पोहोचला आहे.
कोरोनानंतर आता फ्लोरोना संकट
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट नंतर आता जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धुमाकूळ सुरु आहे. कोरोनाविरोधात लसीकरणही वेगाने सुरु आहे. तरीही सध्या ओमायक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. याच दरम्यान एक चिंताजनक बातमी इस्राईलमधून आली आहे. इथे फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. एका वृत्तानुसार, इस्राईल मध्ये फ्लोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. कोविड-19आणि इन्फ्लूएंझा यांच्या दुहेरी संक्रमणाला फ्लोरोना म्हटले जाते. अरब न्यूजने इस्राईल मधील एका वृत्तापत्रातील रिपोर्टच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
राज्यातील 10 मंत्री, 20 आमदार कोरोनाबाधित
राज्यात आतापर्यंत 10 अधिक मंत्री आणि किमान 20 आमदार कोरोनाबाधित आढळले आहेत. जर कोरोना बाधितांची संख्या वाढतच राहिली की, कडक प्रतिबंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत कोरोना बाधितांची 8 हजार 67 रुग्णसंख्या समोर आलेली आहे., अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
COMMENTS