Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इरीगेशन बंगला परिसरात बिबट्याने तीन शेळ्या एक बोकड फडशा पाडला आहे. घटना आज मंगळवारी मध्यरात्री

भारनियमनात दिलासा…अतिरिक्त वीज उपलब्ध
कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात विष घेऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
परप्रांतियाकडं मिळाले पिस्तुलासह पाच काडतुसे | DAINIK LOKMNTHAN

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इरीगेशन बंगला परिसरात बिबट्याने तीन शेळ्या एक बोकड फडशा पाडला आहे. घटना आज मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील इरीगेशन बंगल्या जवळील विरेश अंबादास डावखर यांच्या वस्तीवर बिबट्याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेळ्यांवर हल्ला करुन तीन शेळ्या व एक बोकड्याचा फडशा पाडला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनाधिकारी युवराज पाचरणे यांच्या अधिपत्याखाली राजू रायकर, बाबासाहेब सिनारे आदींनी घटनास्थळी भेट देवून यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला. या परिसरातील तुषार कदम, युवराज कदम, रवींद्र कदम, धनराज कदम, ज्ञानेश्‍वर गागरे, राजेंद्र ढुस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS