Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिराळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

शिराळा / प्रतिनिधी : कराड रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मेणी फाटा, ता. शिराळा येथील ओढ्यावरील पुलावर शनिवार, दि. 29 रोजी सायंकाळी 7.30 च्या दरम

पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी बलाढ्य तर विकास आघाडीसमोर ऐक्याचे आव्हान
Solapur : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन l Lok News24
ग्रामपंचायत निवडणूकीस यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवा : पालकमंत्री

शिराळा / प्रतिनिधी : कराड रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मेणी फाटा, ता. शिराळा येथील ओढ्यावरील पुलावर शनिवार, दि. 29 रोजी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान भरधाव वाहनाने वन्य प्रणी बिबट्यास धडक दिली. या धडकेत बिबट जखमी होऊन रस्त्यावर पडला होता.
घटना स्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, शेडगेवाडीहुन कराडच्या दिशेने भरधाव वेगात जाणारे अज्ञात वाहन मेणी पुलावर आले असता रत्नागिरी-कराड हा दुपदरी रस्ता हा वन्य प्राणी ओलांडत होते. मेणी फाट्यापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर या अज्ञात भरधाव वाहनाने बिबट्यास जोराची धडक दिली. तो रस्त्याच्या मधोमध बेशुध्द अवस्थेत अंदाजे 15 ते 20 मिनीटे पडला होता. यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणारे प्रवासी व नागरीक जमा झाले. एक अज्ञात इसम या ठिकाणी बिबट्याच्या जवळ गेला असता त्याने निपचीप पडलेल्या बिबट्याच्या तोंडावर पाणी ओतले. त्याच वेळी बेशुध्द असणार्‍या बिबट्याने त्या इसमावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने बचाव करण्यासाठी तेथून पळ काढला. काही अंतरावर उभ्या असणार्‍या वाहनात जावून बसल्याने तो बचावला. बिबट्यास जबरी मार लागल्याने बिबट्याला पळता येत नव्हते. यामुळे त्या इसमाचा जीव वाचला जखमी बिबट शेजारील ऊसाच्या शेतात पशार झाला. बिबट्या अजूनही जिवंत असल्याचे वाटसरु व जमलेल्या युवकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वनविभागला कळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. दरम्यान, आज सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी या परिसरात तळ ठोकून आहेत. ही घटना घडल्याची परिसरात चर्चा असून काही घडले नसल्याचे बनाव करुन प्रसार माध्यमापासून माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS