Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा शिवारात बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद

वनविभागाला बिबट्या पकडण्यात यश

भालगाव ः नेवासा तालुक्यातील बहिरवाडी व नेवासा शिवारात अनेक दिवसापासुन शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन होत होते. शेतकर्‍यांनी वन विभागाकडे बिबट्याचा

’साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ः भागवत मुठे पाटील
नेवाशातील आत्मदीप हॉस्पिटलमध्ये आज मोफत तपासणी शिबीर
तटकरेंसारखा नटसम्राट पाहिला नाही

भालगाव ः नेवासा तालुक्यातील बहिरवाडी व नेवासा शिवारात अनेक दिवसापासुन शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन होत होते. शेतकर्‍यांनी वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्याच्या अनुशंघाने वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवार 22 जुलै रोजी वनविभागाकडून पिंजरा लावल्यानंतर दुसर्‍या दिवशी सायंकाळच्या सुमारास बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे शेतकर्‍यांनी बघितल्यानंतर वनविभागाला कळविले. त्यानंतर सकाळी वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाऊस सुरु असल्याकारणाने पिंजरा टँक्टरच्या सहाय्याने वन कार्यालयात घेवुन गेले. सदरच्या बिबट्याने शेतकर्‍यांमधे बर्‍याच दिवसापासुन भीतीचे वातावरण होते. बिबट्याने अनेक ठिकानी शेळ्या फस्त केल्या होत्या. शेतकर्यांना शेतीचे कामे जीव मुठीत धरुन करावे लागत होते. बिबट्या पकडल्यामुळे शेतकर्‍यांनी सुुटकेचा श्‍वास सोडला असून वनविभागाचे आभार मानले.पकडलेला बिबट्या वरिष्टांच्या आदेशाने सुरक्षित स्थळी मुक्त करण्यात येनार असल्याचे वनरक्षक शिसोदे यांनी सांगितले.  सदरची कामगिरी वनपाल डिके, पातारे, वनरक्षक शिसोदे, कानडे, कर्मचारी मोरे, गाढे, घोरपडे यांनी केली. बिबट्या पकडण्याच्या कामगिरीत परीसरातील शेतकर्यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे वनविभागाकडुन सांगण्यात आले आहे.

COMMENTS