Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावकारांनो याद राखा : धन्यकुमार गोडसे

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील अवैध सावकारीबाबत अन्याय झाला असल्यास नागरिकांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे पोलीस

मुलाच्या प्रेमप्रकरणातून वडीलास झालेल्या मारहाणीत मृत्यू
शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उद्या युवा महोत्सव
सातारा जिल्हा बँकेकडून कर्जे स्वस्त केल्याची घोषणा

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील अवैध सावकारीबाबत अन्याय झाला असल्यास नागरिकांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे आवाहन यांनी केले आहे. येणार्‍या काळात अवैध सावकारीबाबत अनेक गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केलेल्या आवाहनानुसार, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेले दोन दिवसापासून अवैध सावकारांचे विरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. हद्दीतील नागरिकांनी अवैध सावकारीबाबत कोणावर अन्याय झाला असल्यास संबंधितांनी कोणतीही भिती न बाळगता त्वरीत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे (9423012345) व पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे (7038250707) यांचेशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर पिडीतांना न्याय देत अवैद्य सावकारी करणार्‍या सावकाराविरुध्द कायदेशिर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचा इशारा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिला.
ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध सावकारीबाबत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर फलटण तालुक्यातील अवैध सावकारीची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. फलटण पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध सावकारीबाबत कडक कारवाईला सुरवात केली आहे.

COMMENTS