Homeताज्या बातम्याविदेश

महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

तीन वेळा फिफा विश्‍वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू

ब्राझीलिया : फुटबॉल विश्‍वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते कॅन्

प्रा. हरी नरके यांच्या रूपाने  राष्ट्राने जेष्ठ परिवर्तनवादी साहित्यीक , लेखक व थोर विचारवंत गमावला:- राजकिशोर मोदी
बेलापूर गावात डास प्रतिबंधक फवारणीस सुरुवात
बांगलादेशात रोहिंग्यांच्या दोन गटातील चकमकीत सहा जण ठार

ब्राझीलिया : फुटबॉल विश्‍वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर त्यांचे अखेर निधन झाले.

पेले हे तीन वेळा फिफा विश्‍वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. मागील वर्षी पेले यांचा कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. ज्यानंतर आता कॅन्सर उपचारासाठी पेले रुग्णालयात होते. पण मागील काही दिवसांपासून ते केमोथेरपीला प्रतिसाद देत नव्हते. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगराणीत ठेवण्यात आले होते. निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पेले यांचा फोटो शेअर करत दिली. प्रेम आणि प्रेरणा हीच पेले यांची खासियत होती, असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. महान फुटबॉलपटूच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. 1958 मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्‍वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्स विरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्रिक केली होती. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे, आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, ठशीीं ळप झशरलश असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. काही दिवसांपासून पेले यांचे कुटुंबीय साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात एकत्रित झाले होते. नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत ’बाबा…. माझी ताकद तुमची आहे’ असं कॅप्शन दिले होते. तेव्हाच त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समोर आले होते.

फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट- पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट अशी त्यांची ओळख होती. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटले जायचे. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असतं, त्यांना सर्वकालीन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिले होते. ते त्यांच्या काळातील सर्वांत यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी तीन वेळा विश्‍वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वांत यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वांत मिळून पेले यांनी जवळपास 1282 गोल मारले होते.

COMMENTS