धमकाविण्याची सरंजामी मानसिकता सोडा !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धमकाविण्याची सरंजामी मानसिकता सोडा !

    प्रा. लक्ष्मण हाके हे समग्र ओबीसीचे नेतृत्व करतात, यावर आमचा आजही विश्वास नाही.  आम्ही त्यांचे टीकाकार आहोत; परंतु, असं अस

राजकीय कटूता संपणार का ?
समान नागरी कायद्याच्या दिशेने…
सत्तेत रमणारा नव्हे तर ,जनविस्तारक नेता!

    प्रा. लक्ष्मण हाके हे समग्र ओबीसीचे नेतृत्व करतात, यावर आमचा आजही विश्वास नाही.  आम्ही त्यांचे टीकाकार आहोत; परंतु, असं असलं तरी त्यांना धमकावण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मराठा नेते करीत आहेत, ती अजिबात समर्थनीय नाही. याउलट, हा जातीयतेचा उघड अभिनिवेश आहे, असं आमचं ठाम मत झालेलं आहे. अजित पवार हे सत्तेचा भाग आहेत आणि सत्तेत जे असतात त्यांच्यावर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या टीका होणं,  हे काही नवीन नाही. प्रा. लक्ष्मण हाके हे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करत असताना, ओबीसींच्या अनुषंगाने ते जरी आपली भूमिका मांडत असले तरी, त्यांची भूमिका ही पारंपारिक ‘माधव’ सेनेच्या पठडीतली असते. त्यामुळे मायक्रो ओबीसी हा त्यांच्या बरोबर नाही; हे आम्ही अनेक वेळा सांगितलेले आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की ते जो लढा देत आहे, तो चुकीचा आहे किंवा त्यांना तो लढा देण्याचा अधिकार नाही! किंबहुना, राजकीय नेतृत्वावर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही, असा जर कोणी अर्थ काढत असेल तर ते सपशेल चूक आहे. ज्याला आपण खास करून सरंजामशाहीचा अभिनवेश म्हणतो, तशा प्रकारात ते मोडणारे आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या आणि महायुतीचा एक घटक पक्ष असलेले आणि तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा नेतृत्वाला आवरण्याची घेण्याची भूमिका घ्यावी. कारण, समग्र समाजाचा भाग जर एखाद्या राजकीय पक्षाला बनायचं असेल तर, त्याचा विस्तार सर्व सामाजिक घटकांमध्ये होणं आवश्यक आहे. अशा वेळी एक जातीय स्वरूप तुमच्या पक्षाला येता कामा नये. प्रा. लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याची धमकी जे देत आहेत, ते आपला जातीय अभिनेवेश अधिक मोठा करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांच्या मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितच कारवाई ला बाध्य करतील. परंतु, ही कारवाई होण्यापूर्वीच त्यांच्या नेत्यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरतं घ्याव; जेणेकरून ओबीसी समाज जो सामाजिक अन्यायात दडपला गेलेला आहे. तो आताशी कुठे आवाज करतो आहे. आपली भूमिका मांडतो आहे. अशावेळी त्याची गळचेपी करणे, किंबहुना त्याला धमकावणं, हे अजिबात समर्थनीय होणार नाही. त्यामुळे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना धमकावणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो. प्रा. लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेशी आणि आंदोलनाशी आम्ही अनेक वेळा असहमती दर्शवली आहे. परंतु, याचा अर्थ हा होत नाही की, ते जी भूमिका मांडता आहे, ती सर्वस्वी चुकीची आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संख्या ही आजही अधिक आहे. परंतु, जनगणना त्या अनुषंगाने झालेली नसल्यामुळे, ती आपल्याला दिसत नाही.  भारतातील कोणत्याही राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ओबीसी जनसमुदायाची लोकसंख्या ही इतर कोणत्याही प्रवर्गापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ते सत्तेत कुणाला आणावं आणि कुणाला नाही, हे ठरवण्याचा निर्णायक अधिकार ओबीसी प्रवर्गाच्या मतदारांमध्ये आहे; हे कोणत्याही राजकीय पक्षाने लक्षात ठेवावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी वर्गाला ज्या पद्धतीने सामावून घेतलं आहे, ते पाहता ओबीसी वर्ग आजही नेतृत्व म्हणून त्यांच्या मागे एकवटला आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. अशावेळी या समुदायाला किंवा या समुदायाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला धमकाविण्याची भूमिका सरंजामशाही मानसिकतेने सोडून द्यावी, हे या निमित्ताने सांगू इच्छितो. 

COMMENTS