चेन्नई ः काही दिवसांपूर्वी प. बंगालच्या संदेशखळी भागात धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकार्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे तृणमूल काँग
चेन्नई ः काही दिवसांपूर्वी प. बंगालच्या संदेशखळी भागात धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकार्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर शहाजहान शेख 55 दिवस गायब होते. दरम्यान प. बंगाला पोलिसांनी गुरूवारी पहाटे त्यांना अटक केली आहे. त्यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी बेटावर घडलेल्या या हिंसक घटना घडली होती. त्यानंतर उघड झालेल्या जमीन हडप आणि लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये शहाजहान शेख आणि त्याचे साथीदार प्रमुख आरोपी असल्याचे आढळले होते
COMMENTS